माजी सभापती विधानसभा उपाध्यक्ष मोरेश्वरराव टेमुर्डे यांचे निधन
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2023 11:53 IST2023-01-22T11:52:09+5:302023-01-22T11:53:09+5:30
1991 ते 1995 आणि 1995 ते 2000 या काळत ते राजुरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते.

माजी सभापती विधानसभा उपाध्यक्ष मोरेश्वरराव टेमुर्डे यांचे निधन
चंद्रपूर : विधान सभेचे माजी उपाध्यक्ष मोरेश्वर टेमुर्डे यांचे आज सकाळी 8 वाजता हृदय विकाराच्या झटक्याने वरोरा येथील निवासस्थानी निधन झाले. ते 81 वर्षांचे होते.
1991 ते 1995 आणि 1995 ते 2000 या काळत ते राजुरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते. चंद्रपूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाढीमध्ये त्यांचे मोठे योगदान होते. शरद पवार यांचे निकटवर्तीय होते. नुकतीच त्यांनी काँग्रेसचे विद्यमान खासदार बाळू धानोरकर यांना काँग्रेसने पुन्हा उमेदवारी देऊ नये, अशी मागणी काँग्रेस नेते, खासदार राहुल गांधी यांना पत्र लिहून केली होती. या मागणीमुळे ते चर्चेत आले होते. दरम्यान, ॲड. टेमुर्डे यांचे पार्थिव देह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे दान करणार असल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली.