त्या वाघावर कॅमेऱ्यातून वनविभागाची नजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:31 IST2021-09-22T04:31:27+5:302021-09-22T04:31:27+5:30
नवरगाव : सिंदेवाही तालुक्यातील खांडला येथील एका व्यक्तीला वाघाने ठार मारल्याने वनविभाग अलर्ट झाले आहे. पुन्हा अनुचित घटना घडू ...

त्या वाघावर कॅमेऱ्यातून वनविभागाची नजर
नवरगाव : सिंदेवाही तालुक्यातील खांडला येथील एका व्यक्तीला वाघाने ठार मारल्याने वनविभाग अलर्ट झाले आहे. पुन्हा अनुचित घटना घडू नये, यासाठी कॅमेऱ्याच्या माध्यमातून वनविभाग वाघाच्या हालचालीवर लक्ष ठेवून आहे.
रविवारी खांडला येथील अनिल पांडुरंग सोनुले यांना वाघाने हल्ला करून ठार केले. मात्र खांडला आणि सरांडी ही दोन्ही गावे जंगलात असून, सकाळपासून सायंकाळपर्यंत नागरिकांचा संपर्क जंगलाशी येतोच. शिवाय घरातील गुरे चारण्यासाठी याच परिसरातील जंगलात जावेच लागते. रविवारसारखी अनुचित घटना पुन्हा घडू नये यासाठी वनपरिक्षेत्र अधिकारी आर. एन. ठेमस्कर यांनी या परिसरात सात कॅमेरे लावले आहेत. पिपर्डा, खांडला, सरांडी येथील पीआरटी टीम व अधिकारीवर्ग हल्ला करणाऱ्या वाघावर लक्ष ठेवून आहेत.
याच घटनास्थळाला लागून रत्नापूर बिट असल्याने वनरक्षक जे. एस. वैद्य यांनी आपल्या टीमच्या माध्यमातून गस्त वाढवली आहे.
वनविभागाच्या वतीने मृतक अनिल पांडुरंग सोनुले यांच्या वारसाला तत्काळ २५ हजार रुपयांची आर्थिक मदत केली.
210921\1316-img-20210921-wa0010.jpg
वनविभागाची टिम कॅमेरा लावून वाघावर लक्ष ठेवून गस्त करतांना