शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

प्रकल्पग्रस्तांची पदयात्रा चंद्रपुरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2018 01:24 IST

ऑनलाईन लोकमतचंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्याला औद्योगिक जिल्हा म्हणून ओळख मिळवून देण्यात सिमेंट उद्योगांचा सिंहाचा वाटा आहे. परंतु कोट्यवधीचा नफा मिळविणाऱ्यां या कंपन्या आता स्थानिकांच्या जीवावर उठल्या आहे. असाच काहीचा प्रकार अंबुजा सिमेंट उद्योगाने केला असून शासनाला जाब विचारण्यासाठी तब्बल ६० किमीची पदयात्रा करीत बुधवारी शेकडो प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले. अचानक ...

ठळक मुद्देजिल्हाधिकारी कार्यालयावर धडक : अंबुजाने केले आदिवासींना भूमिहीन

ऑनलाईन लोकमतचंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्याला औद्योगिक जिल्हा म्हणून ओळख मिळवून देण्यात सिमेंट उद्योगांचा सिंहाचा वाटा आहे. परंतु कोट्यवधीचा नफा मिळविणाऱ्यां या कंपन्या आता स्थानिकांच्या जीवावर उठल्या आहे. असाच काहीचा प्रकार अंबुजा सिमेंट उद्योगाने केला असून शासनाला जाब विचारण्यासाठी तब्बल ६० किमीची पदयात्रा करीत बुधवारी शेकडो प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले. अचानक प्रकल्पग्रस्त घोषणा देत जिल्हाधिकारी कार्यालयात आल्याने एकच धावपळ उडाली.अंबुजा सिमेंट कंपनीच्या विरूध्द प्रकल्पग्रस्तांनी प्रहारचे जिल्हाध्यक्ष पप्पु देशमुख यांच्या नेतृत्वात २० जानेवारीपासून दंड थोपटले आहे. या कंपनीने आपला उद्योग सुरू करण्यासाठी किमान १२ गावातील ५२७ आदिवासींची एक हजार २२६ हेक्टर जमीन अधिग्रहित केली. कंपनीने या सर्वांना अत्यल्प मोबदला देत नोकरीचे आश्वासन दिले. तब्बल १८ वर्षांनंतरही नोकरीचे आश्वासन पूर्ण न झाल्याने प्रकल्पग्रस्तांनी प्रहारकडे धाव घेतली. २० जानेवारीला उपोषण करण्यात आल्यानंतर २४ जानेवारीला प्रहारच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला. मात्र तरीही प्रकल्पग्रस्तांच्या मागणीकडे लक्ष देण्यात आले नाही. त्यामुळे प्रहार व प्रकल्पग्रस्तांनी आपले आंदोलन सुरूच ठेवले. मंगळवारी प्रकल्पग्रस्तांनी सोनापूर ते जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर पदयात्रेला प्रारंभ केला. सोनापूर ते राजुरा पहिला टप्पा आटोपल्यानंतर मंगळवारी रात्री तिथे मुक्काम केला. त्यानंतर बुधवारी सकाळी पुन्हा राजुरा येथील बिरसामुंडा चौकात भगवान बिरसामुंडांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून प्रकल्पग्रस्तांनी पदयात्रा सुरू केली. सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले. मागील १८ दिवसांपासून आपल्या न्याय हक्कासाठी प्रकल्पग्रस्त रस्त्यावर उतरले असताना जिल्हा प्रशासन चुप्पी साधून आहे. कायद्यानुसार राज्यातील कोणत्याही आदिवासीला भूमिहीन करता येत नाही. असे असताना अंबुजाने केलेला करार अवैध असून अंबुजा सिमेंट उद्योगावर अ‍ॅट्रॉसिटी कायद्यातंर्गत गुन्हा दाखल होऊ शकतो का, अंबुजाने पेसा कायद्याचे उल्लंघन केले काय, याची चौकशी करून कारवाई करावी, प्रकल्पग्रस्तांना नोकरी द्यावी व नवीन अधिग्रहण करार करावा, अशी मागणी जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.पदयात्रेला ठिकठिकाणी पाठिंबाया पदयात्रेचे अनेक ठिकाणी स्वागत करण्यात आले. बल्लारपुरात स्वागतासह नागरिकांनी अल्पोपहाराची व्यवस्था केली होती. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयासमोर बाबूपेठ येथे धम्मचक्र स्पोर्टींग क्लब व नगरसेविका मून यांनी स्वागत केले आणि पदयात्रा समोर निघाली. महाकाली मंदिर येथे जिल्हा सामान्य रुग्णालयातील कामगारांनी स्वागत केल्यानंतर गांधी चौकात दिव्यांगाच्या संघटनांनी आतषबाजी करीत प्रकल्पग्रस्तांना पाठिंबा दिला. आंबेडकर पुतळा येथे रिपब्लिकन स्टुडंट फेडरेशनने व राष्ट्रीय मुस्लीम हक्क संघर्ष समितीने जयंत टॉकीज चौकात पदयात्रेकरूंचा उत्साह वाढविला. जिल्हा परिषद येथे फुटपाथ असोशिएशन तर प्रियदर्शिनी चौकात वडगाव येथील मातृशक्तीने पदयात्रेचे स्वागत केले.अन्यथा आंदोलन तीव्रवारंवार मोबदल्याची मागणी करूनही अंबुजा कंपनी प्रकल्पग्रस्तांकडे दुर्लक्ष करीत आहे. प्रशासनालाही वारंवार निवेदन देऊन मागणी रेटून धरल्यानंतर त्यांनीही याकडे लक्ष दिले नाही. मागण्या पूर्ण न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्यात येणार आहे.