शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
2
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
3
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
4
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
5
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
6
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
7
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
8
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
10
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
11
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
12
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
13
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
14
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
15
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
16
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
17
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
19
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
20
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
Daily Top 2Weekly Top 5

भरधाव बोलेरो उलटली, जीवहानी टळली

By admin | Updated: October 4, 2014 23:25 IST

येथून जवळच असलेल्या हुळकी जामणी रस्त्याच्या बाजुलाच लागलेल्या दगडाच्या छोट्या खाणीत बोलेरो महिंद्रा पिकअप मालवाहक वाहन उलटले. सुदैवाने या अपघातातून दोघांचा जीव वाचला.

टेमुर्डा : येथून जवळच असलेल्या हुळकी जामणी रस्त्याच्या बाजुलाच लागलेल्या दगडाच्या छोट्या खाणीत बोलेरो महिंद्रा पिकअप मालवाहक वाहन उलटले. सुदैवाने या अपघातातून दोघांचा जीव वाचला. याच वेळी शाळा सुटल्याने या मार्गाने विद्यार्थिनींची गर्दी होती. मात्र सुदैवाने या वाहनाची कुणालाही धडक बसली नाही. सायंकाळी ४ वाजता वरोरा येथून प्लास्टिकचे पाईप बोलेरो महिंद्रा पिकअप मालवाहक वाहनात भरले व वरोरा तालुक्यातील तुमगाव येथे हे वाहन जाण्यास निघाले असता, टेमुर्ड्याजवळ एका धाब्यावर वाहन चालक मनोज देवूरकर व वाहन मालक डोये या दोघांनीही मद्यप्राशन केले. दोघेही जामणी (बु) मार्गे वाहन घेवून निघाले असता जामणी (बु) व तळेगाव येथील शाळेत दररोज ये-जा करणाऱ्या विद्यालयीन व शाळकरी विद्यार्थ्यांना वाहनात बसविण्याच्या नादात मद्यपी मनोज देवूरकर यांचा वाहनावरून ताबा सुटला व भरधाव पाईपने भरलेली बोलेरो (एमएच ३४ एम ७८३८) जामणी (बु) रस्त्याच्या कडेला असलेल्या छोट्या दगडाच्या खाणीत उलटले. वाहनात चालक मनोज देवूरकर व मालक डोये हे दोघेच होते. मद्यधुंद अवस्थेत बसले होते. याच ठिकाणी दगडाच्या मोठमोठ्या खाणी पाण्याने भरलेल्या होत्या. पण सुदैवाने हे वाहन छोट्या खाणीत उलटले. अपघातानंतर दोघेही सुखरूप वाहनाबाहेर पडले. शाळकरी मुले-मुली विद्यालयीन युवक-युवती समोर निघून गेल्या होत्या तर काही मागे राहिले होते. ही घटना माहित होताच नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. या अपघाताची कुठेही तक्रार करण्यात आली नाही. यापूर्वीही या ठिकाणी असाच अपघात घडला होता. (वार्ताहर)