शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
5
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
6
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
7
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
8
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
9
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
10
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
11
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
12
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
13
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
14
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
15
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
16
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
17
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
18
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
19
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
20
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
Daily Top 2Weekly Top 5

भौतिकशास्त्राच्या पेपरमध्ये चुका

By admin | Updated: February 27, 2015 00:55 IST

उच्च माध्यमिक परीक्षा मंंडळाच्या वतीने गुरूवारी बारावीच्या परीक्षेत भौतिकशास्त्र विषयाचा पेपर घेण्यात आला.

वरोरा : उच्च माध्यमिक परीक्षा मंंडळाच्या वतीने गुरूवारी बारावीच्या परीक्षेत भौतिकशास्त्र विषयाचा पेपर घेण्यात आला. मात्र, प्रश्न पत्रिकेत तीन गुणांसाठी एक प्रश्न चुकीचा विचारण्यात आल्याने अनेकांनी प्रश्न सोडविलाच नाही. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी प्रश्न सोडविला नाही, त्यांना तीन गुणांचा फटका बसणार असल्याने प्रश्न सोडवणाऱ्या व न सोडविणाऱ्या विद्यार्थ्यांना सरसकट तीन गुण देण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. भौतिकशास्त्र विषयाचा ७० गुणाचा पेपर गुरूवारी घेण्यात आला. यातील प्रश्न क्रमांक ३ मध्ये एकूण चार उपप्रश्न ७ गुणांसाठी विचारण्यात आले होते. या उप प्रश्नामधील क्रमांक ४ च्या प्रश्नात (ांङ्म१ २३ीी’ = 12 ७ 10 6/0 ूंल्ल ि८ ाङ्म१ २३ीी’ = 20 ७ 1010 ठ/े2) असे विचारण्यात आले होते. यात मोठा वाय ऐवजी लहान वाय छापण्यात आले. वरती अल्फा असल्याने व खाली गामा छापण्यात आल्याने विद्यार्थी चांगलेच संभ्रमात सापडले. छापण्यात चुक झाल्यामुळे काहीही करता विद्यार्थ्यांना या प्रश्नाची सोडवणूक करता आली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना तीन गुणापासून वंचित राहावे लागणार आहे. राज्यभरात हा पेपर झाल्याने भौतिकशास्त्राचा पेपर देणारे राज्यातील हजारो विद्यार्थी तीन गुणापासून वंचित राहणार असल्याचे मानले जात आहे. ही उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाची चुक असल्याने विद्यार्थ्यांना या प्रश्नामधील तीन गुण सरसकट देण्याची मागणी आहे.(तालुका प्रतिनिधी)