शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

बल्लारपूर हागणदारी मुक्तीत विदर्भात प्रथम

By admin | Updated: April 3, 2016 03:50 IST

बल्लारपूर पंचायत समितीची स्थापना १४ मार्च २००२ रोजी करण्यात आली. यात एकूण १७ ग्रामपंचायतींचा समावेश करण्यात आला.

१०० टक्के उदीष्ट पुर्ण : १७ ग्राम पंचायतींचा समावेशबल्लारपूर : बल्लारपूर पंचायत समितीची स्थापना १४ मार्च २००२ रोजी करण्यात आली. यात एकूण १७ ग्रामपंचायतींचा समावेश करण्यात आला. तालुक्यातील कुटुंब संख्या ९८६४ असून स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत शौचालयाचे बांधकाम पूर्ण करून वापरात आणले आहेत. पहिल्या टप्प्यातील उदिष्ट पूर्ती झाल्याने संपूर्ण तालुका हागणदारी मुक्त झाला आहे. बल्लारपूर तालुका हागणदारी मुक्तीत विदर्भात पहिला असल्याची माहिती शनिवारी संवर्ग विकास अधिकारी बी.बी. गजभे यांनी येथे पत्रपरिषदेत दिली.स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत बल्लारपूर तालुका हागणदारी मुक्त करण्याचा संकल्प ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद यांच्या समन्वयातून करण्यात आले यासाठी पदाधिकारी अधिकारी संपर्क अधिकारी व जिल्हा परिषद यांच्या समन्वयातून करण्यात आला. यासाठी पदाधिकारी अधिकारी व गावकरी यांच्याशी सलग सात महिन्यापासून संवाद साधला जात होता. लोकसहभाग घेण्यात आला लोकांना शौचालय बांधकाम करण्यास प्रवृत्त करण्यात आले. शौचालयाचा नियमित वापर करावा, उघड्यावर शौचास जाऊ नये, यासाठी भल्या पहाटे गुड मार्निंग पथकाच्या माध्यमातून गावागावांत जागृती अभियान राबविण्यात आले यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेंद्र कल्याणकर यांचे सहकार्य वेळोवेळी घेण्यात आले.स्वच्छ भारत मिशन ग्रामीणचे ध्येय गाठण्यासाठी स्वच्छतेकडून समृद्धीकडे जाण्यासाठी लोकसहभागातून स्वच्छतेची चळवळ निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. गावातील सरपंच, उपसरपंच, सदस्य, पंचायत समितीचे व जिल्हा परिषदेचे पदाधिकारी यांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने हागणदारी मुक्त तालुक्याचे पहिल्या टप्प्यातील यश मिळाले. तालुक्यातील एकूण १७ ग्रामपंचायतीने हागणदारी मुक्तीचे ग्रामसभेचे प्रस्ताव जानेवारी महिन्यात सादर केले. फेब्रुवारीमध्ये एकूण ९८६४ कुटुंबाची शौचालय बांधकाम व नियमित वापरासंदर्भातील प्रक्रिया आॅनलाईन करुन शासनाला सादर करण्यात आल्याची माहिती संवर्ग विकास अधिकारी बी.बी. गजभे यांनी दिली.बल्लारपूर तालुका हागणदारीमुक्त झाला आहे. मात्र जबाबदारी वाढली आहे. दुसऱ्या टप्प्यातील तालुक्यातील ग्रामपंचायतीची घोषणा करण्याचे धोरण आहे. विविध योजनांची माहिती देण्यासह उघड्यावर शौचास जाणाऱ्यावर प्रतिबंधात्मक कारवाईचा आधार घ्यावा लागणार आहे. गुडमार्निंगपथकाच्या माध्यमातून गावपातळीवर निरंतर प्रक्रिया सुरू ठेवावी लागणार आहे. (शहर प्रतिनिधी)