शहरं
Join us  
Trending Stories
1
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
2
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
3
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
4
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
5
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
6
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
7
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
8
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
9
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
10
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
11
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
12
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
13
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
14
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
15
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
16
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
17
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
18
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
19
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
20
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'

नदीवर पहिल्यांदाच बंधाऱ्याची निर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2018 22:05 IST

राजू गेडाम । लोकमत न्यूज नेटवर्क मूल : पावसाळ्यात पावसाचे पाणी आल्यानंतर ते अडून न राहता इतरत्र वाहून जाते. ...

ठळक मुद्दे३.९३ लक्ष घनमीटर पाण्याची साठवण : अंधारी नदीवर सुरू आहे बांधकाम

राजू गेडाम ।लोकमत न्यूज नेटवर्कमूल : पावसाळ्यात पावसाचे पाणी आल्यानंतर ते अडून न राहता इतरत्र वाहून जाते. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात पाण्याची आवश्यकता भासते. पावसाचे पाणी अडून राहावे व त्याचा उपयोग शेतीबरोबरच इतरही व्यवसायाला व्हावे, या दृष्टीने राज्याचे अर्थ, नियोजन व वनमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नाने मूल ताजलुक्यातील चिरोली गावाजवळील अंधारी नदीवर सिमेंट बंधाऱ्याची निर्मिती होणार आहे. शेतकºयांना वरदान ठरणाऱ्या या बांधाऱ्यामुळे ३.९३ लक्ष घनमीटर पाण्याची साठवण होणार आहे. यापूर्वी सिंचन विभागांतर्गत बंधाऱ्याचे बांधकाम केले जात होते. या बंधाºयाचे काम सार्वजनिक बांधकाम विभाग करणार असून चंद्रपूर जिल्ह्यातील नदीवरील हा पहिलाच सिमेंट बंधारा असणार आहे.मूल तालुक्यातील चिरोली गावाजवळील सुशी, पोंभूर्णा, चिंतलधाबा पोडसा ते राज्यसीमा (राज्य ३६९) रस्त्यावरील अंधारी नदीवर ९० मीटर लांबीचा उंच पूल सार्वजनिक बांधकाम विभागाने सन २०१५-१६ या वर्षात बांधला. सदर पुलालगत सिमेंट बंधारा बांधण्यात यावा. जेणेकरून शेतकऱ्यांवर शेती व्यवसायाबरोबरच इतर व्यवसायाला जोड देता येईल, अशी मागणी राज्याचे अर्थ, नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली. शेतकऱ्यांची आवश्यकता बघून ना. सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यसभा खासदार अनु अगा यांच्या स्थानिक विकास निधीतून १३ आॅक्टोबर २०१७ च्या आदेशान्वये १११.०५ लक्ष किमतीच्या बांधाऱ्याला प्रशासकीय मान्यता दिली. या बंधाºयाची लांबी ९० मीटर असून गेटची उंची ३.५० मीटर आहे. या बंधाऱ्यांमुळै ३.९३ घनमीटर म्हणजे ३९३ टीसीएम पाण्याची साठवण होणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील नदीवर हा पहिलाच सिमेेंट बंधारा बांधला जात असून भविष्यात नदीवर असल्याप्रकारचे बंधारे बांधून पाण्याची क्षमता वाढविली जाणार असल्याचे बोलले जात आहे.बंधारा होणार स्थानिक स्वराज्य संस्थेला हस्तांतरितसदर बांधकामाला सुरूवात झाली असून एप्रिल २०१९ पर्यंत सदर बंधाऱ्यांचे काम पूर्णत्वास येणार आहे. ७०.४४ टक्के निधीमध्ये सदर बंधाºयांचे काम पूर्ण होणार आहे. म्हणजे २९.५६ टक्के निधीची बचत होणार आहे. बांधकाम पूर्ण झाल्यानंतर पाच वर्षे बंधाऱ्यांची देखभाल व सनियंत्रण संबंधित कंत्राटदाराकडे राहणार आहे. त्यानंतर सदर बंधारा स्थानिक स्वराज्य संस्थेकडे हस्तांतरित केला जाणार आहेशेतकऱ्यांना वरदान ठरू पाहणारा अंधारी नदी जवळील सिमेंट बंधाऱ्यांचे काम एप्रिल २०१९ मध्ये पुर्णत्वास येणार आहे. या बंधाऱ्यामुळे पाण्याची साठवण क्षमता वाढणार असून शेती उद्योगाबरोबरच मासेमारी व्यवसायासाला प्रोत्साहन दिले जाणार आहे.- रूपेश बोदले, सहा. अभियंता बांधकाम विभाग, मूल