शहरं
Join us  
Trending Stories
1
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
4
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
5
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
6
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
7
बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
8
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
9
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
10
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
11
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
12
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
13
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
14
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
15
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
16
इराणने लवकर शहाणे व्हावे...; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
17
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
18
एकीची मेहंदीही निघाली नव्हती, तर दुसरीचे मेमध्ये होते लग्न, पण काळाने घातला घाला
19
मे डे... मे डे... मे डे...! हे उद्योगाचे आर्थिक गाऱ्हाणे नाही तर एका मोठ्या राष्ट्रीय संकटाची नांदी
20
‘मातोश्री’ पुन्हा एकदा पिताश्रीच्या मार्गाने; ‘रिमोट कंट्रोल’च्या भूमिकेत पक्षाला गतवैभव मिळेल?
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय तंत्रनिकेतनच्या मॉडेल रूमला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2020 06:00 IST

रविवारची सुट्टी होती. परंतु सदर महाविद्यालयात एका छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्यामुळे सकाळी ९ वाजताच्या सुमारास महाविद्यालयातील काही प्राध्यापक महाविद्यालयात आले. त्यांना काहीतरी जळत असल्याचे लक्षात आले. त्याच क्षणी सदर प्राध्यापकांनी ज्या दिशेने जळका वास येत होता, त्या दिशेने धाव घेत पाहाणी केली असता महाविद्यालयातील स्थापत्य अभियांत्रिकीकरिता असलेल्या प्रात्यक्षिक खोलीला आग लागल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

लोकमत न्यूज नेटवर्कब्रम्हपुरी : शहरातील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील प्रात्यक्षिक खोलीला (मॉडेल रूमला) रविवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. यात खोलीतील संपूर्ण साहित्य जळून खाक झाले.रविवारची सुट्टी होती. परंतु सदर महाविद्यालयात एका छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्यामुळे सकाळी ९ वाजताच्या सुमारास महाविद्यालयातील काही प्राध्यापक महाविद्यालयात आले. त्यांना काहीतरी जळत असल्याचे लक्षात आले. त्याच क्षणी सदर प्राध्यापकांनी ज्या दिशेने जळका वास येत होता, त्या दिशेने धाव घेत पाहाणी केली असता महाविद्यालयातील स्थापत्य अभियांत्रिकीकरिता असलेल्या प्रात्यक्षिक खोलीला आग लागल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. लगेच याची माहिती संबंधित प्राध्यापकाने प्राचार्यांना दिली. प्राचार्यांनी लगेच अग्निशामक दलाला ताबडतोब महाविद्यालयात पाचारण केले. अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी जवळपास एक तासाच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली. मात्र तोपर्यंत खोलीतील संपूर्ण साहित्य जळून खाक झाले होते. ही आग नेमकी कशामुळे लागली, हे अद्याप स्पष्ट झाले नाही. मात्र शॉर्टसर्किट होऊन आगीची ठिणगी सदर खोलीमध्ये असलेल्या डांबर, बेंझीन आदी ज्वलनशील पदार्थावर पडल्यामुळे आग लागली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. सदर घटनेची तक्रार ब्रह्मपुरी पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.

टॅग्स :fireआग