डोंगा खरेदीसाठी एक लाख रुपयांची आर्थिक मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:34 IST2021-09-16T04:34:03+5:302021-09-16T04:34:03+5:30
मागील वर्षी आलेल्या महापुरामुळे नदीपलीकडे जाण्यासाठी असलेले गावकऱ्यांचे तीन डोंगे वाहून गेले. त्यामुळे शेतकऱ्यांना नदीपलीकडे जायचे झाल्यास नदीपात्रातील वाहत्या ...

डोंगा खरेदीसाठी एक लाख रुपयांची आर्थिक मदत
मागील वर्षी आलेल्या महापुरामुळे नदीपलीकडे जाण्यासाठी असलेले गावकऱ्यांचे तीन डोंगे वाहून गेले. त्यामुळे शेतकऱ्यांना नदीपलीकडे जायचे झाल्यास नदीपात्रातील वाहत्या पाण्यातून जीव धोक्यात घालून पायी जावे लागत होते. या समस्येची गांभीर्याने दखल घेत राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत-पुनर्वसन, बहुजण कल्याण मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी पिंपळगाव भोसलेवासीयांना डोंगा खरेदीसाठी स्वतःकडून एक लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याचे ठरविले. त्यापैकी ५० हजार रु. यापूर्वी गावकऱ्यांना दिले. उर्वरित ५० हजार रु. आर्थिक मदत आता त्यांनी काँग्रेस कमिटीच्या पदाधिकाऱ्यांमार्फत पाठवली. यावेळी खेमराज तिडके, जि.प.सदस्य स्मिता पारधी, जि.प.सदस्य प्रमोद चिमूरकर, किसान काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नानाजी तुपट, उदापूरचे सरपंच सोनू नाकतोडे, पिंपळगाव भोसले येथील सरपंच सुरेश दुनेदार उपस्थित होते.
150921\img-20210915-wa0054.jpg
डोंगा खरेदीसाठी मदत देताना पदाधिकारी