गुरुदेव सेवा मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून आर्थिक मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:34 IST2021-09-10T04:34:48+5:302021-09-10T04:34:48+5:30
देवराव लांडे हे गुरुदेव सेवा मंडळाचे कार्यकर्ते होते. आपल्या मनमिळावू स्वभावामुळे तसेच गरजूंना मदत करण्याच्या स्वभावामुळे ते सुपरिचित होते. ...

गुरुदेव सेवा मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून आर्थिक मदत
देवराव लांडे हे गुरुदेव सेवा मंडळाचे कार्यकर्ते होते. आपल्या मनमिळावू स्वभावामुळे तसेच गरजूंना मदत करण्याच्या स्वभावामुळे ते सुपरिचित होते. घरबांधणीच्या कामावर रोजंदारीने काम करून ते कुटुंबाचा चरितार्थ चालवित होते. यादरम्यान त्यांना आजाराने ग्रासले व अकस्मात त्यांचे निधन झाले.
कमावत्या कुटुंब प्रमुखाचे निधन झाल्याने त्यांच्या अपंग पत्नी किरण देवराव लांडे तसेच २ मुलींवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. आपल्या २ मुलींच्या समोरचा शिक्षणाचा प्रश्न त्यांच्या अपंग पत्नीसमोर आ वासून उभा आहे.
श्री गुरुदेव सेवा मंडळाचे कार्यकर्ते तसेच घोडपेठ येथील सरपंच अनिल खडके, चोखोबा मोहितकर, संजय घुगुल यांनी लांडे कुटुंबाची ही अडचण ओळखून या कार्यासाठी गावातून वर्गणी गोळा केली व अंदाजे १० हजार रुपयांची रोख रक्कम किरण लांडे यांच्याकडे सुपूर्द केली, तसेच ज्यांना शक्य असेल त्यांनीसुद्धा या कुटुंबाला मदत करावी, असे आवाहन गुरुदेव सेवा मंडळाचे कार्यकर्ते संजय घुगूल यांनी केले आहे.