अखेर धान खरेदी नोंदणीसाठी मुदतवाढ, शेतकऱ्यांना मिळणार लाभ 

By राजेश मडावी | Published: December 29, 2023 03:18 PM2023-12-29T15:18:57+5:302023-12-29T15:19:20+5:30

खरेदी केंद्रांची मोजकी संख्या आणि इंटरनेट नेटवर्कची समस्यांमुळे शेतकऱ्यांची धान खरेदी नोंदणी पुरेशी झाली नाही.

Finally extension of deadline for registration of grain purchase farmers will get benefits | अखेर धान खरेदी नोंदणीसाठी मुदतवाढ, शेतकऱ्यांना मिळणार लाभ 

अखेर धान खरेदी नोंदणीसाठी मुदतवाढ, शेतकऱ्यांना मिळणार लाभ 

चंद्रपूर : खरेदी केंद्रांची मोजकी संख्या आणि इंटरनेट नेटवर्कची समस्यांमुळे शेतकऱ्यांची धान खरेदी नोंदणी पुरेशी झाली नाही. शेतकऱ्यांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शासनाकडे पाठपुरावा केला. दरम्यान, धान खरेदी नोंदणीसाठी १५ जानेवारी २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली.

धान उत्पादक शेतकरी आधारभूत किंमत योजनेअंतर्गत नेमण्यात आलेल्या खरेदी केंद्रावर नोंदणी करून धान व भरडधान्य विक्री करतात. विविध जिल्ह्यात केंद्रांची संख्या मोजकीच आहे. त्यामुळे ज्या जिल्ह्यात धान व भरडधान्य मोठ्या प्रमाणात उत्पन्न होते त्या जिल्ह्याला खरेदी नोंदणीच्या मिळालेल्या मुदतवाढीमुळे लाभ होणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभूर्णा तालुक्यातील शेतकरी बांधवांनी याबाबत मागणी केली होती. या मागणीचे गांभीर्य लक्षात घेत वन व सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी धान नोंदणीची मुदत ताबडतोब वाढविण्यात यावी, असा आग्रह केला.

यासंदर्भात ना. मुनगंटीवार यांनी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांना पत्र लिहून मागणी केली. त्यांच्या पत्राची दखल घेत ना. भुजबळ यांनी संबंधित विभागाला काही तासातच आदेश निर्गमित करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार धान नोंदणीची मुदत आता १५ जानेवारी २०२४ पर्यंत वाढविण्यात आली आहे.

Web Title: Finally extension of deadline for registration of grain purchase farmers will get benefits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.