शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

बाजारात जे विकते, शेतात तेच पिकवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2020 05:01 IST

कुणबी समाज मंडळाच्या वतीने स्थानिक चांदा क्लब ग्राउंड येथे सुरु असलेल्या शेतकरी महोत्सव २०२० च्या मुख्य सत्राचे उदघाटन खासदार बाळू धानोरकर यांच्या हस्ते शनिवारी झाले. यावेळी बळीराजा विशेषांक ई-बुकचे प्रकाशन खासदार धानोरकर यांच्या हस्ते करण्यात आले.

ठळक मुद्देबाळू धानोरकर : शेतकरी महोत्सव २०२०

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : बाजारात जे सहज विकल्या जाते, ज्या वस्तूची मागणी आहे, तीच वस्तू शेतात पिकवा. शेतीतून आकस्मिक होणारे नुकसान सोसण्यासाठी शेतीपुरक जोडधंदा करा. शासनाकडून मिळणाऱ्या सबसिडीचा व योजनांचा लाभ घ्या, असे प्रतिपादन खासदार सुरेश ऊर्फ बाळू धानोरकर यांनी केले.कुणबी समाज मंडळाच्या वतीने स्थानिक चांदा क्लब ग्राउंड येथे सुरु असलेल्या शेतकरी महोत्सव २०२० च्या मुख्य सत्राचे उदघाटन खासदार बाळू धानोरकर यांच्या हस्ते शनिवारी झाले. यावेळी बळीराजा विशेषांक ई-बुकचे प्रकाशन खासदार धानोरकर यांच्या हस्ते करण्यात आले.सावित्री-ज्योतीबा मंचावर यावेळी अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य विधानसभेचे माजी उपाध्यक्ष अ‍ॅड. मोरेश्वर टेमुर्डे होते. तर सत्कारमूर्ती चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार किशोर जोरगेवार होते. प्रमुख पाहुणे म्हणून अ‍ॅड. वामनराव चटप, मनोहर पाऊणकर, अनिल धानोरकर, रमेश राजूरकर, दिनेश चोखारे, राष्ट्रवादीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य, बळीराज धोटे, डॉ. सुरेश महाकुलकर, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सरकार्यवाह सुधाकर अडबाले, तात्यासाहेब मत्ते, अ‍ॅड. पुरुषोत्तम सातपुते, श्रीधरराव मालेकर आदी उपस्थित होते. यावेळी आमदार जोरगेवार, राजेंद्र वैद्य, अ‍ॅड. चटप यांचा सत्कार करण्यात आला.अ‍ॅड. मोरेश्वर टेमुर्डे म्हणाले, या शेतकरी मेळाव्याने समाजात एक पायंडा घातला आहे. आता दरवर्षीच हा शेतकरी मेळावा व्हावा. सामान्य नागरिकांनी शेतकऱ्यांचा माल घेताना भावबाजी करु नये, असे ते म्हणाले.अ‍ॅड. वामनराव चटप म्हणाले, शेतकऱ्यांना मारक कायदे रद्द करण्यात यावे. शेतकऱ्याचा माल जीवनावश्यक वस्तूंच्या कायद्यातून बाहेर काढला जावा. तरच शेतकऱ्यांच्या मालाचा भाव वाढेल.सत्कारमूर्ती आमदार जोरगेवार म्हणाले, पुढील वर्षी शासनासोबत पब्लिक पार्टनर जॉइंट व्हेंचर करून या शेतकरी मेळाव्याचे आयोजन करू. शेतकऱ्यांसाठी जे-जे करता येईल ते करु, असे त्यांनी सांगितले. प्रास्ताविक अ‍ॅड. पुरुषोत्तम सातपुते यांनी केले. संचालन प्रा. रविकांत वरारकर तर आभार विनायक धोटे यांनी केले.