शेतकऱ्यांची कोठारी ते चंद्रपूर पैदलवारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2018 12:19 AM2018-12-09T00:19:06+5:302018-12-09T00:19:45+5:30

आपल्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी बीआरएसपीचे विदर्भ महासचिव राजू झोडे यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी कोठारी ते बाबुपेठ पैदल मार्च करुन वीज वितरण कंपनीला धडक दिली. तसेच आपल्या मागण्याचे निवेदन अधीक्षक अभियंत्याला दिले.

Farmers' warehouse to Chandrapur pedestrian | शेतकऱ्यांची कोठारी ते चंद्रपूर पैदलवारी

शेतकऱ्यांची कोठारी ते चंद्रपूर पैदलवारी

Next
ठळक मुद्देवीज वितरण कंपनीवर धडक : अधीक्षक अभियंत्यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : आपल्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी बीआरएसपीचे विदर्भ महासचिव राजू झोडे यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी कोठारी ते बाबुपेठ पैदल मार्च करुन वीज वितरण कंपनीला धडक दिली. तसेच आपल्या मागण्याचे निवेदन अधीक्षक अभियंत्याला दिले.
शेतीसाठी २४ तास विद्युत पुरवठा करावा, लोडशेडिंग व अवाढव्य विद्युत दर कमी करावे, कृषीपंपाना मोफत विद्युत देण्यात यावी, चंद्रपूर जिल्हा लोडशेडिंग मुक्त करावा, बल्लारपूर तालुका दुष्काळग्रस्त घोषीत करावा, शेतीयंत्र व शेतीसाधनांवरिल जीएसटी कर त्वरीत रद्द करावा, आदी मागण्यांसाठी सदर मोर्चा काढण्यात आला.
सदर मोर्चाला सकाळी ११ वाजता कोठारीपासून सुरुवात करण्यात आली. मोर्चामध्ये गावातील शेतकरी जूळत गेले. दरम्यान शेतकऱ्यांनी चंद्रपुरातील वीज वितरण कंपणीवर धडक दिली. मात्र अधीक्षक अभियंता गैरहजर होते. दरम्यान त्यांनी पाठविलेल्या प्रतिनिधीजवळ निवेदन देण्यात आले. निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात गिरजाशंकर वाढई, अनिल विरुडकर, लक्ष्मण तेलतुंबडे, सुरेश वासाडे, गौतम नळेशंकर खोब्रागडे, वंदना तामगाडगे, राजूरकर, जूनधरे, अक्षय देरकर, पुंडलिक ठावरी, सचिन पावडे, सतीश करमनकर, महादेव देवतळे, शंकर भंटारकर, सुर्यकांत दयालवार, संतोष झाडे उपस्थित होते.

Web Title: Farmers' warehouse to Chandrapur pedestrian

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.