शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

पारंपरिक पिकांकडे शेतकऱ्यांचा कल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 00:05 IST

जिल्ह्यात वन्यप्राणी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करीत असल्यामुळे शेतकरी नगदी पिकांकडे पाठ फिरवू लागला आहे. वारंवार घडणाºया वन्यप्राण्यांच्या घटनांमुळे शासनाकडून कोणतीच ठोस उपाययोजना होताना दिसत नाही. वनविभागाचे वारंवार उंबरठे झिजवूनही शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळत नाही.

ठळक मुद्देपिकांचे नुकसान : वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांमुळे शेतकरी धास्तावले

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर: जिल्ह्यात वन्यप्राणी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करीत असल्यामुळे शेतकरी नगदी पिकांकडे पाठ फिरवू लागला आहे. वारंवार घडणाऱ्या वन्यप्राण्यांच्या घटनांमुळे शासनाकडून कोणतीच ठोस उपाययोजना होताना दिसत नाही. वनविभागाचे वारंवार उंबरठे झिजवूनही शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळत नाही. परिणामी अनेक शेतकरी पुन्हा एकदा पारंपारिक पद्धतीच्या धान पिकाकडे वळत आहे.जिल्ह्यात धान उत्पादक शेतकºयांनी नगदी पिकाकडे वळून आपला उदरनिर्वाह करावा असा सल्ला कृषी विभागाकडून दिला जातो. परंतु वन्यप्राण्यांच्या वाढत्या समस्या, खताचे वाढते भाव यावर कोणत्याच उपाययोजना होत नसल्यामुळे शेतकºयांना नाईलाजास्तव पुन्हा एकदा पारंपारिक धान शेतीचा पर्याय निवडावा लागत आहे.शेतात वाढत्या रानडुकरांच्या संख्येमुळे शेतकऱ्यांवर हल्ले होण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतशिवारात दहशतीच्या छायेखाली वावरावे लागत आहे. जिल्ह्यात नगदी पीक म्हणून मोठ्या प्रमाणात अन्य पिकाच्या लागवडीकडे शेतकरी वळत आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. मात्र विभागाकडून पाहिजे तसे सहकार्य मिळत नसल्याने तसेच शासनाकडून योग्य मोबदलाही मिळत नसल्याने शेतकऱ्यांचा नगदी पिकाकडील कल कमी होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या सस्यांकडे विशेष लक्ष देवून त्यांना विविध पिकांकडे वळण्याचा सल्ला द्यावा, अशी मागणी केली जात आहे.वन्यप्राण्यांचा वाढता अधिवासधान, भाजीपाला, मिरची यासारख्या पिकांमुळे वन्यप्राण्यांचा शेतातील वावर वाढतो. परिणामी हरिण, रानडुकर, निलगाय, माकडांचे कळप हिरवा चारा व पाण्यासाठी सुरक्षीत जागा यामुळे अशा पिकांकडे आपला मोर्चा वळवितात. तसेच रात्रीच्या वेळी अस्वल, ससे, रानडुकर तसेच त्यांच्या पाठोपाठ त्यांच्या शिकारीसाठी बिबट व लांडगे यांचाही वावर वाढतो.त्यामुळेचे जिल्ह्यात अनेक ठिकाणी शेतकरी व शेतमजुरांवर वन्यप्राण्याचा हल्ला झाल्याच्या घटना वाढल्या आहेत.तुटपुंजी मदतगेल्या काही वर्षांत पावसाची सततची अनियमितता असल्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात घट झाली आहे. तसेच जिल्ह्यातील शेतकºयांची धानपिकासह मिरची व अन्य पिकांच्या लागवड क्षेत्रात घट झाली आहे. शासनाकडून हमीभाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांना दिवसेंदिवस वाढत्या उत्पादन खर्चामुळे शेती करणे कठीण होत आहे. शासनाकडून तुटपूंजी मदत दिली जाते. त्यामुळे अतिरिक्त खर्च शेतकऱ्यांसाठी परवडणारा नाही. तर पिकांचे संरक्षण आणि उपाययोजनाही शेतकºयांसाठी डोकेदुखी ठरत आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी