शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या TVK पक्षाचा 'ब्लॉकबस्टर शो'; DMK ला जोरदार धक्का
2
West Bengal Election Result 2026: पश्चिम बंगालमध्ये बहुमतासाठी किती हवा आकडा?; भाजपा इतिहास घडवण्याच्या तयारीत
3
तामिळनाडूत प्रस्थापितांना धक्का? अभिनेते विजय यांच्या टीव्हीकेची जोरदार मुसंडी, सुरुवातीलाच एवढ्या जागांवर मिळवली आघाडी
4
West Bengal Assembly Election 2026: प. बंगालमध्ये सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपानं गाठली शंभरी; TMC सोबत अटीतटीची लढत
5
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; सेन्सेक्स ३४४ तर निफ्टीमध्ये ६६ अंकांची वाढ; 'हे' शेअर्स सुस्साट
6
'राजा शिवाजी'मध्ये शिवरायांच्या सासूच्या भूमिकेत दिसली 'ही' अभिनेत्री, पोस्ट शेअर करत म्हणाली...
7
Election Results 2026: केरळमध्ये काँग्रेस सुसाट, भाजपाचीही सात जागांवर आघाडी
8
अंगारक संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, WhatsApp Status शेअर करून बाप्पाचे आशीर्वाद सर्वांपर्यंत पोहोचवा
9
West Bengal Assembly Election: पश्चिम बंगालमध्ये निकालाच्या आदल्या रात्री काळेबेरे? ममता बॅनर्जींच्या ‘त्या’ पोस्टनं खळबळ!
10
Baramati Rahuri Results 2026: बारामतीत अपेक्षेप्रमाणे सुनेत्रा पवार यांना आघाडी, तर राहुरीचा कल काय? आहे अशी अपडेट
11
बंगालमध्ये तृणमूल-भाजपामध्ये अटीतटीची लढत, सुरुवातीच्या कलांमध्ये कुणाला आघाडी? अशी आहे आकडेवारी
12
Tamil Nadu Elections 2026: विजय थलपती ते खुशबू सुंदर... पडद्यावरच्या कलाकारांची प्रतिष्ठा पणाला, कोण मारणार बाजी?
13
भाजपासाठी पश्चिम बंगाल ठरणार 'लास्ट फ्रंटियर'; जय-पराजयाचा परिणाम 'मिशन UP' वर पडणार?
14
Post Office ची कमाई करुन देणारी स्कीम, जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹४४,९९५ चं फिक्स व्याज; मिळतेय सरकारची 'गॅरेंटी'
15
राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार?
16
'राजा शिवाजी'चं वीकेंड कलेक्शन किती? समोर आले आकडे; मराठी प्रेक्षकांची मान उंचावली
17
पश्चिम बंगालमधील या दोन मतदारसंघात 'कांटे की टक्कर', निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष
18
आजचे राशीभविष्य, ०४ मे २०२६: मिथुन, वृश्चिक, मकर राशींना धनलाभाचे संकेत; कसा असेल तुमचा दिवस?
19
पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा
20
पाऊस चोरणारे देश? अमेरिका-इस्रायलवर 'ढगचोरी'चा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांतर्फे अधिकाऱ्यांना दोषारोपपत्राचा अहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 00:44 IST

तालुक्यातील डोंगर्ला येथील लघुसिंचन विभागाद्वारे ३३ शेतकऱ्यांच्या जमिनी लघुसिंचन विभागाने हस्तांतरित केल्या.

कुटुंबासह घेराव : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलनलोकमत न्यूज नेटवर्कचिमूर : तालुक्यातील डोंगर्ला येथील लघुसिंचन विभागाद्वारे ३३ शेतकऱ्यांच्या जमिनी लघुसिंचन विभागाने हस्तांतरित केल्या. मात्र मागील १४ वर्षांपासून शेतकरी जमिनीच्या मोबदल्यापासून वंचित आहेत. यासाठी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांच्या दिरंगाईने सदर शेतकरी वंचित राहिले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना मोबदला मिळाला नाही, याकरिता अन्यायग्रस्त शेतकऱ्यांनी मंगळवारी दुपारी १ वाजता उपविभागीय अभियंता यांना दोषारोपपत्राचा अहेर देत कुटुंबासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष नारायण जांभुळे यांचा नेतृत्वात अधिकाऱ्यांना घेराव केला.चिमूर तालुक्यातील डोगर्ला येथे लघुसिंचन विभागामार्फत तलाव व कालव्याकरिता सन २००३ मध्ये ३३ शेतकऱ्यांच्या जमिनी हस्तांतरीत केल्या. या जमिनीवर सन २००५ मध्ये तलावाचे बांधकाम पूर्ण केले. मात्र ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी लघू सिंचाई विभागाने हस्तांतरीत केल्या. त्या शेतकऱ्यांना १४ वर्षानंतरही एक दमडीही मिळाली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती हालाखीची झाली आहे.अन्यायग्रस्त शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचा आर्थिक मोबदला मिळावा, म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष नारायन जांभूळे यांनी लघुसिंचन विभागाला जाग आणण्यासाठी अनेक आंदोलने केली. त्यामुळे या शेतकऱ्यांचा मोबदल्याच्या मागणीला गती आली व लघुसिंचन विभागाने मोबदला देण्याची कारवाई सुरु केली.मंगळवारला अन्यायग्रस्त शेतकऱ्यांनी उपविभागीय अभियंता यांना बागंड्याचा अहेर देण्याचा इशारा दिला होता. मात्र बांगड्याच्या अहेराच्या ऐवजी संबंधीत शेतकऱ्यांना मोबदल्यापासून वंचित ठेवण्यासाठी कारणीभूत असणाऱ्या अधिकाऱ्यांना दोषारोपपत्राचा अहेर देत चक्क कार्यालयात कुटुंबीयांसह अधिकाऱ्यांना घेराव केला. आंदोलनाची दखल घेत उपअभियंता लघुसिंचन यांनी शेतकऱ्यांना पंधरा दिवसांत मोबदला देण्यात येणार असल्याचे आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले. आंदोलनामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष नारायन जांभुळे, केशव चौधरी, मेघराज चौधरी, परसराम चौधरी, तुळशिराम चौधरी, हेमराज चौधरी, दिलीप गजभे, संतोष गजभे, योगराज जांभूळे, संजय जांभूळे, बाळकृष्ण जांभूळे, कालीदास जांभूळे, हरी जांभूळे आदी शेतकरी सहभागी होते.