वाघाच्या दहशतीने शेतकरी हवालदिल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:33 IST2021-09-15T04:33:01+5:302021-09-15T04:33:01+5:30
सावली : सावली तालुका जंगलव्याप्त परिसर असून जंगलालगत शेती असलेल्या शेतकऱ्यांचे वाघाच्या दहशतीमुळे शेतात ये-जा करणे बंद झाले आहे. ...

वाघाच्या दहशतीने शेतकरी हवालदिल
सावली : सावली तालुका जंगलव्याप्त परिसर असून जंगलालगत शेती असलेल्या शेतकऱ्यांचे वाघाच्या दहशतीमुळे शेतात ये-जा करणे बंद झाले आहे. या वर्षीच्या हंगामात पीक नष्ट होण्याच्या मार्गावर असून शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
सावली वनपरिक्षेत्रात वाघाची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्याचबरोबर जंगली डुकरांचा सुळसुळाटसुद्धा वाढला आहे. तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांची शेती जंगलालगत असल्याने हिंस्र पशूच्या दहशतीत शेतीची कामे करावी लागत आहेत. त्यामुळे मानव व वन्यजीव संघर्ष वाढीस लागला आहे.
कोट
वाघ व जंगली डुकरांच्या हैदोसामुळे तालुक्यातील शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. परिणामी शेतकऱ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे वन प्रशासनाने वेळीच उपाययोजना करून वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा अन्यथा वन प्रशासनाच्या विरोधात जनआंदोलन उभारण्यात येईल.
- अनिल स्वामी अध्यक्ष, शेतकरी सोसायटी सावली