फ्लॅटमध्येच थाटला बनावट नोटांचा छापखाना; चंद्रपूरमध्ये ९१ लाखांचे नकली चलन जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2026 15:11 IST2026-03-12T15:10:16+5:302026-03-12T15:11:07+5:30

Chandrapur : शहरातील दुर्गापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका अपार्टमेंटमध्ये तब्बल ९१ लाखांच्या बनावट नोटांचा साठा स्थानिक गुन्हे शाखेला आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

Fake currency printing house found in flat; Fake currency worth 91 lakhs seized in Chandrapur | फ्लॅटमध्येच थाटला बनावट नोटांचा छापखाना; चंद्रपूरमध्ये ९१ लाखांचे नकली चलन जप्त

Fake currency printing house found in flat; Fake currency worth 91 lakhs seized in Chandrapur

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर :
शहरातील दुर्गापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका अपार्टमेंटमध्ये तब्बल ९१ लाखांच्या बनावट नोटांचा साठा स्थानिक गुन्हे शाखेला आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी शुभम दिनेश नागर (२६ वर्ष, रा. पंचेड, जि. रतलाम, मध्य प्रदेश) याला अटक केली असून घटनास्थळावरुन कलर प्रिंटर, ५०० रुपयांच्या बनावट नोटा व साहित्य जप्त केले आहे.

१० मार्च रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पेट्रोलिंगवर असताना ऊर्जानगर मेजर गेटजवळील राजश्री अपार्टमेंटमधील फ्लॅट नंबर २०३ मध्ये काही इसम ५०० रुपयांच्या बनावट नोटा तयार करत असल्याची माहिती मिळाली. या आधारावर पोलिसांनी तातडीने सापळा रचून धाड टाकली. परंतु, फ्लॅटला कुलूप लावले होते. पोलिसांनी फ्लॅटचे लॉक तोडले असता बेडरूममध्ये १० पुठ्यांचे बॉक्समध्ये भारतीय चलनाच्या हुबेहूब दिसणाऱ्या ५०० च्या रंगीत छायांकित नोटा होत्या. यासोबतच एक कलर प्रिंटर आणि इतर साहित्य असा एकूण ९१ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

एक महिन्यांपूर्वी किरायाने घेतला फ्लॅट

  • महिनाभरापूर्वी फ्लॅट मालक सुमित कालीपथ पॉलने हा फ्लॅट मध्य प्रदेशातील काही लोकांना भाड्याने दिला होता.
  • पोलिसांनी शुभम नागर याला ताब्यात घेतले असता फसवणुकीच्या उद्देशाने या नोटा तयार केल्याचे समोर आले. त्यावरून दुर्गापूर पोलिस ठाण्यात बीएनएसच्या कलम ३१८, ३३६, १८२ अन्वये गुन्हा नोंदवला.
  • ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनात एसडीपीओ प्रमोद चौगुले, परिविक्षाधिन पोलिस अधीक्षक गौरव कायंदेपाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे, एपीआय दीपक कांकरेडवार, एपीआय बलराम झाडोकर, पीएसआय संतोष निंभोरकर यांच्यासह एलसीबीच्या पथकाने केली.

Web Title : चंद्रपुर में फ्लैट में नकली नोटों का कारखाना; 91 लाख रुपये जब्त।

Web Summary : चंद्रपुर पुलिस ने एक फ्लैट में नकली मुद्रा का भंडाफोड़ किया, ₹91 लाख के नकली ₹500 के नोट जब्त किए। शुभम दिनेश नागर को गिरफ्तार किया गया। एक रंगीन प्रिंटर और सामग्री जब्त की गई। उसने एक महीने पहले फ्लैट किराए पर लिया था।

Web Title : Fake currency factory busted in Chandrapur flat; ₹91 lakh seized.

Web Summary : Chandrapur police discovered a counterfeit currency operation in a flat, seizing ₹91 lakh in fake ₹500 notes. Shubham Dinesh Nagar was arrested. A color printer and materials were confiscated. He rented the flat a month ago.