शहरं
Join us  
Trending Stories
1
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
2
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
3
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
4
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
5
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
6
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
7
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
8
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
9
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
10
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
11
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
12
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
13
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
14
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
15
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
16
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
17
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
18
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
19
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
20
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रसंतांचे विश्वव्यापक साहित्य घराघरांत पोहोचवा

By admin | Updated: January 11, 2016 01:11 IST

राष्ट्रसंत साहित्य समाजाला गती व दिशादर्शक आहे. ग्रामगीतेतून उज्ज्वल राष्ट्र निर्माण होताना आदर्श माणूस घडत असतो.

बाबुराव वाग्दरकर : पिंपळगाव येथे १४ वे राज्यस्तरीय साहित्य विचारकृती संमेलनाचे उद्घाटनप्रकाश काळे  पिंपळगाव(कर्मयोगी तुकारामदादा गीताचार्य साहित्य नगरीतून)राष्ट्रसंत साहित्य समाजाला गती व दिशादर्शक आहे. ग्रामगीतेतून उज्ज्वल राष्ट्र निर्माण होताना आदर्श माणूस घडत असतो. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजाचे समग्र साहित्य विश्वव्यापक असून ते घराघरांत पोहचवण्याचे कार्य कृतियुक्त कार्यकर्त्यांनी स्वयंसेवा तत्वावर करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन पिंपळगाव येथे आयोजित १४ वे राज्यस्तरीय राष्ट्रसंत साहित्य विचारकृती संमेलनात संमेलनाध्यक्ष बाबुराव वाग्दरकर यांनी केले.राष्ट्रसंत विचार साहित्य परिषद केंद्रीय समितीद्वारा आयोजित संमेलनाचे उद्घाटन राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार अ‍ॅड. संजय धोटे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून आदर्श गाव राजगडचे चंदू पाटील मारकवार, ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर, संजय तिळसम्रुतकर, पुणे येथील सामाजिक कार्यकर्ते पंढरीनाथ चंदनखेडे, सरपंच विजय मरस्कोल्हे, तंटामुक्त अध्यक्ष वामनराव गनफडे, पोलीस पाटील प्रशांत नागपूरे, सुनील बोढाले, माजी आमदार मोरेश्वर टेंभुर्डे, झाडीपट्टीच्या बहिणाबाई अंजनाबाई खुणे आदींची उपस्थिती होती.कार्यक्रमाची सुरुवात ग्रंथदिंडीने करण्यात आली. कार्यक्रमाची भूमिका विषद करताना ग्रामगीताचार्य बंढोपंत बोढेकर म्हणाले, राष्ट्रसंताच्या विचारातून या संमेलनाची निर्मिती झाली असून या माध्यमातून समाज जागृती व आदर्श गावे निर्माण होताना कार्याकर्ते घडत आहे. ही विशेषता असल्याचे सांगितले. यावेळी विचार साहित्य परिषदेद्वारे देण्यात येणारे चैतन्य युवा पुरस्काराचे मानकरी बिबी येथील कवी अविनाश पोईनकर, संध्या पोडे (माजरी), दिलीप डाखरे (नांदेपेरा), अभय घटे (राजुरा), विलास चौधरी (पेंढरी), संजय आवारी (कृष्णानपूर) यांना प्रदान करण्यात आले. प्रास्ताविक विलास उगे यांनी केले. संचालन अ‍ॅड. राजेंद्र जेनेकर तर आभार गुणवंत खोरगडे यांनी मानले. कायक्रमाला परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.