शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
2
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
3
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
4
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
5
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
6
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
7
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
8
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
9
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
10
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
11
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
12
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
13
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
14
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
15
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
16
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
17
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
18
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
19
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
20
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
Daily Top 2Weekly Top 5

एलबीटीबाबत व्यापाऱ्यांचा अपेक्षाभंग

By admin | Updated: March 19, 2015 00:59 IST

चंद्रपुरात महानगरपालिका अस्तित्वात आल्यानंतर स्थानिक संस्था कर (एलबीटी) लागू करण्यात आले.

चंद्रपूर : चंद्रपुरात महानगरपालिका अस्तित्वात आल्यानंतर स्थानिक संस्था कर (एलबीटी) लागू करण्यात आले. मात्र प्रारंभापासूनच व्यापाऱ्यांनी याला दर्शविलेला विरोध आजवर कायमच ठेवला होता. बुधवारी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बजेट सादर करताना एलबीटी रद्दची घोषणा केली. या निर्णयाने व्यापाऱ्यांमध्ये आनंदोत्सव असला तरी १ एप्रिलऐवजी याची अंमलबजावणी १ आॅगस्टपासून होणार असल्याने व्यापाऱ्यांचा अपेक्षाभंग झाला आहे.चंद्रपुरात एलबीटी लागू करू नये, यासाठी चंद्रपुरातील व्यापाऱ्यांनी जोरदार आंदोलने केली. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेऊन चर्चाही केली होती. विशेष म्हणजे, या एलबीटीविरोधात व्यापारी असोसिएशनने तब्बल एक आठवडा आपली दुकाने बंद ठेवली होती. तरीही चंद्रपूर महानगरपालिका हद्दीत एलबीटी लागू करण्यात आला. एलबीटीपोटी महानगरपालिकेला दर महिन्याला सहा कोटींचे उत्पन्न मिळते, हे विशेष. एलबीटी लागू झाल्यानंतरही व्यापाऱ्यांनी आपला लढा कायमच ठेवला होता. काही दिवसांपूर्वी मुंबई येथे व्यापारी असोसिएशनची बैठकही पार पडली होती. दरम्यान, राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी एलबीटी रद्द करण्याची घोषणा केली. यांसदर्भात चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष हर्षवर्धन सिंघवी यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपुरात एलबीटी रद्द करून व त्या जागेवर कोणताही अधिभार न लावण्याची घोषणा करून व्यापाऱ्यांना खूश केले आहे. मात्र १ एप्रिलपासूनच एलबीटी भरावा लागणार नाही, असे वाटत असताना याच्या अंमलबजावणीसाठी आणखी पाच महिन्याचा कालावधी वाढविण्यात आला, याबाबत खंत आहे. दारूबंदी १ एप्रिलपासून लागू होऊ शकते, तर याच तारखेपासून एलबीटी रद्द का होत नाही, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. यासंदर्भात व्यापारी महासंघाचे अध्यक्ष व चेंबर आॅफ कॉमर्सचे उपाध्यक्ष सदानंद खत्री यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनीही आपला अपेक्षाभंग झाल्याचे सांगितले. वास्तविक १ एप्रिलपासून एलबीटी रद्द करण्यात येईल, असे अपेक्षित होते. मात्र या घोषणेची अंमलबजावणी १ आॅगस्टपासून होत आहे. पाच महिन्यांचा कालावधी मोठा असतो. शिवाय १ आॅगस्टपासून अंमलबजावणी होईलच का, याचीही खात्री देता येत नसल्याचे ते म्हणाले. तुषार एजन्सीचे संचालक विवेक पत्तीवार म्हणाले, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याशी व्यापारी संघटनेने चर्चा केली होते. एलबीटी रद्द होणार, हे अपेक्षित होते. मात्र १ एप्रिलपासून एलबीटी द्यावा लागणार नाही, असे वाटले होते. १ आॅगस्टपासून अंमलबजावणी होणार असल्याने आनंद झाला असला तरी अपेक्षाभंगही झाला आहे. (शहर प्रतिनिधी)