अखेर रेल्वे ‘तो’ मार्ग सुरू ठेवणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 05:00 IST2021-09-24T05:00:00+5:302021-09-24T05:00:49+5:30
नागभीड नगरपरिषदेतील बाम्हणी येथून आंतरजिल्हा मार्ग भंडारा जिल्ह्यातील पवनीकडे जातो. पवनीसाठी कमी अंतराचा रस्ता म्हणून नागभीड तालुक्यातील अनेक नागरिक या रस्त्यानेच प्रवास करतात. तर पवनी तालुक्यातील चांदी, चन्नेवाडा व इतर दोन-तीन गावांना पवनीपेक्षा नागभीड जवळ असल्याने नागरिक कोणत्याही कामासाठी याच रस्त्याने येतात. या गावातील बरेचसे विद्यार्थी नागभीड येथेच शिक्षणासाठी येतात.

अखेर रेल्वे ‘तो’ मार्ग सुरू ठेवणार
लोकमत न्यूज नेटवर्क
नागभीड : बाम्हणी-चांदी हा आंतर जिल्हा मार्ग सुरू राहणार आहे. हा मार्ग बंद करण्याच्या हालचाली रेल्वे विभागाने चालविल्या होत्या. ‘लोकमत’ने लक्ष वेधल्यानंतर रेल्वे विभागाने भूमिगत रस्त्याचे काम सुरू केले आहे.
नागभीड नगरपरिषदेतील बाम्हणी येथून आंतरजिल्हा मार्ग भंडारा जिल्ह्यातील पवनीकडे जातो. पवनीसाठी कमी अंतराचा रस्ता म्हणून नागभीड तालुक्यातील अनेक नागरिक या रस्त्यानेच प्रवास करतात. तर पवनी तालुक्यातील चांदी, चन्नेवाडा व इतर दोन-तीन गावांना पवनीपेक्षा नागभीड जवळ असल्याने नागरिक कोणत्याही कामासाठी याच रस्त्याने येतात. या गावातील बरेचसे विद्यार्थी नागभीड येथेच शिक्षणासाठी येतात. बाम्हणीतील काही शेतकऱ्यांच्या शेतजमिनी रेल्वे लाईनच्या पलीकडे आहेत. नागरिकांना रोजच रेल्वे फाटक ओलांडून शेतात जावे लागते. नाॅरो गेज रेल्वे लाईनमुळे अडचण नव्हती. रेल्वेने तयार केलेल्या फाटकावरून नागरिक व वाहनाचे अवागमन सुरू होते.
हा मार्ग बंद झाला असता तर दोन्ही जिल्ह्यांतील नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागले असते. आता रेल्वेने भूमिगत मार्गाच्या कामास सुरुवात केली आहे. त्यामुळे दोन्ही जिल्ह्यांतील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे.
-अमृत शेंडे, माजी सरपंच, बाम्हणी
मार्ग बंद झाल्यास अनेक समस्या
रेल्वेने हा मार्ग बंद केला तर बाम्हणी येथील शेतकऱ्यांसमोर तसेच भंडारा जिल्ह्यातील काही गावांसमोर अनेक समस्या निर्माण होणार होत्या.