शहरं
Join us  
Trending Stories
1
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
2
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
3
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
4
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
5
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
6
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
7
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
8
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
9
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
10
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
11
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
12
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
13
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
14
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
15
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
16
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
17
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
18
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
19
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
20
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
Daily Top 2Weekly Top 5

राजोली परिसरात बीएसएनएल सेवेचा बोजवारा

By admin | Updated: October 6, 2016 01:34 IST

भारत संचार निगम या भारताच्या अग्रण्य दुरसंचार कंपनीची सेवा गेल्या काही महिन्यापासून पूर्णत: विस्कळीत झाली आहे.

राजोली : भारत संचार निगम या भारताच्या अग्रण्य दुरसंचार कंपनीची सेवा गेल्या काही महिन्यापासून पूर्णत: विस्कळीत झाली आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उदासिन आणि हलगर्जी कारभारामुळे राजोली परिसरातील बीएसएनएल ग्राहकांना मानसिक त्रास सहन करावा लागत असून आर्थिक भुर्दंडही बसत असल्याचे चित्र दिसत आहे.स्थानिय दुरसंचार केंद्रातील वीज पुरवठा खंडीत झाल्याबरोबर बीएसएनएलची दूरसंचार सेवा ठप्प पडत असून मोबाईल कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर असतात. या केंद्रातील स्वयंचलीत बॅटरी सिस्टम नादुरूस्त असल्यामुळे वीज पुरवठा सुरळीत झाला, तरीही सेवा ठप्प पडलेलीच असते. त्यामुळे आॅनलाईन सोबत जोडलेल्या शासकीय, निमशासकीय बँक आणि खासगी कार्यालयातील कामकाज बंद पडलेले असून त्याचा नाहक त्रास नागरिकांना सोसावा लागत असते. ही बाब संबंधीत अधिकाऱ्याना माहित असूनही त्याकडे कानाडोळा केल्या जात असल्याचे ग्राहकात बोलले जात आहे. महिन्याच्या मुदतीतील विविध प्रीपेड प्लान ग्राहकांनी रिचार्ज केलेले असतात. परंतु येथील दूरसंचार सेवा १५ ते २० दिवसच सुरू राहत असल्यामुळे त्यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.मूल तालुक्यातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्यास त्याच्या उदासिन व बेजबाबदार प्रवृत्तीचा प्रत्यय येत असल्याचे ग्राहकाचे म्हणणे आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी बीएसएनएल मोबाईल धारकांनी केली आहे. (वार्ताहर)