शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
3
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
4
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
5
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
6
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
7
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
8
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
9
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
10
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
11
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
12
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
13
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
14
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
15
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
16
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
17
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
18
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
19
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
20
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत

दहशतीचा अंत; बल्लारपूरच्या कुख्यात गुंड छोटू सुर्यवंशी टोळीवर ‘मोक्का’

By परिमल डोहणे | Updated: November 6, 2025 14:35 IST

Chandrapur : चंद्रपूर पोलिसांची मोठी कारवाई; दहा जणांचा समावेश

चंद्रपूर : बल्लारपूर परिसरात दहशत माजवणाऱ्या कुख्यात गुंड छोटू सुर्यवंशी टोळीवर अखेर पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा १९९९ (मोक्का) अंतर्गत कारवाई करत कडक पाऊल उचलले आहे. या टोळीतील तब्बल १० जणांविरुद्ध मोक्का कलम लावण्यात आले असून चंद्रपूर पोलिसांनी टोळीचा कणा मोडण्यास यश मिळवले आहे.

टोळीचे नेतृत्व करणारे चंद्रेश उर्फ छोटू देसराज सुर्यवंशी (२३), येदुराज उर्फ बच्ची रामनरेश आरक (२७) यांच्यासोबत विविध गुन्ह्यांत सामील असलेले  मुकेश राजु वर्मा (२०), अमित बालकृष्ण सोनकर (२६), गौरिश श्रीनिवास कुसमा (१९), अनवर अब्बास शेख (२३) असे मोक्का लागलेल्या गुंडांची नावे आहेत.

चंद्रपूर शहर पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात दि. २० ऑक्टोबर २०२५ रोजी पोलिसांनी गंजवार्ड परिसरात सापळा रचून ही टोळी जेरबंद केली. त्यांच्याकडून २ माऊझर पिस्टल, २ देशी कट्टे, ३५ जिवंत काडतुसे आणि ४ धारदार खंजर असा घातक शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. ही टोळी शहरात दरोडा टाकून त्यातून मिळणाऱ्या पैशातून पुढे खुनासारख्या गंभीर गुन्ह्याची तयारी करत असल्याची माहिती मिळाली होती. पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा गुन्हा टळला.

अशी माजवली दहशत 

ही टोळी स्वतःचा दबदबा निर्माण करण्यासाठी जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशन हद्दीत गेल्या काही वर्षांपासून सातत्याने बेकायदेशीर जमाव तयार करून दहशत माजवली होती. खुनाचा प्रयत्न, खंडणी, शासकीय कामात अडथळा, दंगा, धमक्या, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान, तसेच बेकायदेशीर शस्त्रे बाळगणे असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे त्यांनी केले आहेत. त्यामुळे या टोळीवर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

ही कारवाई पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलिस अधीक्षक ईश्वर कातकडे, एसडीपिओ प्रमोद चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रपूर शहरचे पीआय निशिकांत रामटेके, एलसीबी पीआय अमोल काचोरे, पीएसआय संतोष निंभोरकर, सफौ अरुण खारकर व पोअं गजानन नन्नावरे यांच्या मोक्का पथकाने केली.

"कोणत्याही गुंडाच्या टोळीच्या अवैध मागणीला प्रतिसाद देऊ नये किंवा त्यांच्या धमक्यांना भीक घालू नये. त्यांच्या कृत्यांची तात्काळ माहिती जवळच्या पोलीस स्टेशनला द्यावी, जेणेकरून अशा गुन्हेगारीला आळा बसू शकेल."- मुम्मका सुदर्शन, पोलीस अधीक्षक, चंद्रपूर

English
हिंदी सारांश
Web Title : Chandrapur's notorious Chhotu Suryavanshi gang crushed under MCOCA act.

Web Summary : Police in Chandrapur have taken strict action against the notorious Chhotu Suryavanshi gang, known for spreading terror in Ballarpur, by invoking the MCOCA Act against 10 members after seizing weapons. The gang extorted and planned murders; police intervention averted a major crime.
टॅग्स :MCOCA ACTमकोका कायदाCrime Newsगुन्हेगारीArrestअटक