वेळेपूर्वीच गायब होतात कर्मचारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:31 IST2021-09-22T04:31:36+5:302021-09-22T04:31:36+5:30
सिंदेवाही : सरकारी काम आणि चार महिने थांब, अशी म्हण सर्वपरिचित आहे. पाच दिवसांचा आठवडा झाला. कामाच्या वेळा वाढल्या. ...

वेळेपूर्वीच गायब होतात कर्मचारी
सिंदेवाही : सरकारी काम आणि चार महिने थांब, अशी म्हण सर्वपरिचित आहे. पाच दिवसांचा आठवडा झाला. कामाच्या वेळा वाढल्या. परंतु निर्धारित वेळेत कर्मचारी उपस्थित राहत नसल्याने कार्यालयात येरझरा मारून सामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत.
शासनाने कामाला गती येण्यासाठी कार्यालयीन कामाच्या वेळा वाढवून पाच दिवसांचा आठवडा केला. सकाळी ९.४५ ते संध्याकाळी ६.१५ या वेळात शासकीय कार्यालय सुरू राहावे, असे स्पष्ट आदेश आहेत. परंतु शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून निर्धारित वेळेचे बंधन पाळले जात नाही. शासकीय कार्यालयातील अनेक कर्मचारी अजूनही जुन्याच पद्धतीने कामकाज चालवीत आहेत. सकाळी ११ वाजताच्या पुढे येतात आणि ४ वाजता गायब होतात. यातही उपस्थित वेळात विविध कारणे सांगून हे कर्मचारी खुर्चीवर राहत नाही. कोरोनाच्या काळापासून तर या कर्मचाऱ्यांची उपस्थिती आणखीनच कमी झाल्याचे पाहवयास मिळते. त्यामुळे कामासाठी वारंवार कार्यालयात चकरा मारून सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. या कर्मचाऱ्यांकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे.