शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

हत्तीपायाचे साडेअकरा हजार रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2019 00:12 IST

हत्तीपाय समूळ नष्ट करण्यासाठी प्रशासनाकडून विविध योजना राबविण्यात येत आहेत. मात्र प्रशासनाकडून नुकत्याच राबविलेल्या हत्तीरोग रुग्ण शोधमोहिमेत जिल्ह्यात हत्तीपायाचे ११ हजार ६७७ रुग्ण जिल्ह्यात आढळून आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देचंद्रपूर जिल्ह्याचे वास्तव : धानपट्ट्यात रुग्णांचे प्रमाण अधिक, जनजागृतीची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : हत्तीपाय समूळ नष्ट करण्यासाठी प्रशासनाकडून विविध योजना राबविण्यात येत आहेत. मात्र प्रशासनाकडून नुकत्याच राबविलेल्या हत्तीरोग रुग्ण शोधमोहिमेत जिल्ह्यात हत्तीपायाचे ११ हजार ६७७ रुग्ण जिल्ह्यात आढळून आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे अर्धेअधिक रुग्ण मूल, सावली, नागभीड, सिंदेवाही, चिमूर, ब्रह्मपुरी या धानपट्यात आढळून आल्याने धानपट्टयात जनजागृतीची अधिक गरज असल्याचे स्पष्ट होत आहे.चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात धानाची शेती केली जाते. जून महिना लागला की धानपट्यात पºहे टाकले जातात. त्यानंतर शेतीची मशागत केली जाते. त्यानंतर पाऊस पडला की, धानाची रोवणी केली जाते. ही कामे चिखलातच केली जातात. घाण पाणी शेतात असते. हे वातावरण क्यूलेक्स डासाच्या मादीस पोषक ठरत आहे. त्यामुळे धानपट्ट्यात मागील काही वर्षांत हत्तीरोगाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहेत.दरवर्षी १६ ते ३१ आॅगस्ट या कालावधीत हत्तीरोग रुग्ण शोधमोहीम राबविली जाते. या शोधमोहिमेत ११ हजार ६७७ रुग्ण हत्तीरोगाचे आढळून आले. तर पाच हजार ९३३ रुग्ण अंडवृद्धी असलेले आढळून आले.जिल्ह्यात पंधरा तालुके आहेत. यात एक हजार ६०८ गावांचा समावेश आहे. त्यातील २२८ गावे हत्तीरोगाकरिता संवेदनशील आहेत. ही गावे धानपट्ट्यातील आहेत. संवेदनशील असलेल्या गावात राष्ट्रीय हत्तीरोग नियंत्रण पथकामार्फत सर्वेक्षणाचे काम सुरू आहे. डासांचा चावा टाळणे हा रोगप्रतिबंधाचा एक प्रकार आहे. वाढत्या हत्तीपायाच्या रोगाला टाळण्यासाठी प्रशासनाकडून विशेष अशा जनजागृती मोहिम राबविण्याची गरज आहे.सोमवारपासून हत्तीरोग दुरीकरण मोहीमजिल्ह्यात २५ फेब्रुवारी ते १ मार्च या कालावधीत हत्तीरोग दुरीकरणाकरिता सामूहिक औषधोपचार मोहीम राबविली जाणार आहे. मोहिमेअंतर्गत हत्तीरोग जंतुविरोधी डीईसी औषधांसोबतच जंतुनाशक अलबेंडाझोल या औषधांची मात्रा खाऊ घालावयाची आहे. २००४ पासून सार्वत्रिक हत्तीरोग औषधोपचार मोहीम सुरू आहे. यामुळे हत्तीरोगाचा जंतूभार ३.७१ वरून १.१७ पर्यंत कमी झाला. या मोहिमेसाठी आठ हजार ८७९ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे कर्मचारी घरोघरी जाऊन वयोगटानुसार गोळ्या देणार आहेत.अशी घ्यावी काळजीहत्तीरोगाचा प्रसार करणारे क्यूलेक्स डास घाण पाण्याची गटारे, खड्डे, नाल्यांत तयार होतात. हत्तीरोगाचे प्राबल्य कमी करण्याकरिता शौचालयाच्या व्हेंट पाइपला जाळ्या बांधाव्यात, डासोत्पत्ती स्थानांत डासअळी भक्षक गप्पी मासे टाकावेत. झोपताना मच्छरदाणीचा उपयोग करावा, अंगभर कपडे घालून अथवा पांघरूण घेऊन डासांच्या चाव्यापासून स्वत:चे रक्षण करावे, उघड्या त्वचेवर डास प्रतिरोधक लावावे, अशी माहिती जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. अनिल कुकडपवार यांनी दिली.

टॅग्स :Healthआरोग्य