शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

काजळसरच्या शेतकऱ्याने शोधले मोहक बासमती वाण

By admin | Updated: June 25, 2015 01:21 IST

येथून ६ कि.मी. वर असलेल्या काजळसर (त. चिमूर) येथील शेतकरी हरिदास श्रावण दुधनकर यांनी ....

पेंढरी (कोकेवाडा) : येथून ६ कि.मी. वर असलेल्या काजळसर (त. चिमूर) येथील शेतकरी हरिदास श्रावण दुधनकर यांनी आपल्या कल्पक वृत्तीतून मोहक बासमती सुगंधित धानाचे वाण शोधून काढले. त्यांचे हे कार्य इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरले आहे.सदर धानाचा शोध हा सन २००९ मध्ये क्रांती धानातून दोन-दोन लोंब काढून करण्यात आला होता. त्यानंतर सन २०१४ ला जास्त उत्पादन काढले. एका लोंबात अंदाजे ३८० दाणे आहेत. दुधनकर यांनी दोन एकरात मागील वर्षी ४५ क्विंटलच्या वर उत्पन्न म्हणजेच एकरी साडेबावीस क्विंटल उत्पन्न घेतले. त्या सर्व धानाचे त्यांनी साडेबावीस क्विंटल तांदूळ बनवून नागपूरला घरगुती नऊ हजार रुपये तर चंद्रपूरच्या कृषी प्रदर्शनात सहा हजार रुपये क्विंटल भावाप्रमाणे विकले. तसेच या धानाच्या कणीचे (बारिक तांदळाचे) अठरा हजार असे त्यांना एकुण उत्पन्न एक लाख ७ हजार १०० रुपये झाले असून धान लागवडीपासून ते तांदुळ विकण्यापर्यंतचा एकुण खर्च अंदाजे ४० हजार रुपये इतका आला. या संशोधक वृत्तीसाठी त्यांना चिमूरचे तालुका कृषी अधिकारी एम.पी. पवार, नेरीचे मंडळ कृषी अधिकारी आर.के. सोलव हे मार्गदर्शन करीत आहेत. या कार्यात त्यांची सहचारिणी ललिता दुधनकर, मुलगा मनोज व सून शितल दुधनकर सहकार्य करीत आहेत. या प्रयोगामुळे ते इतर शेतकऱ्यांसाठी आदर्श ठरत आहेत. (वार्ताहर)