शहरं
Join us  
Trending Stories
1
पंधराशेच्या बदल्यात लेकींवर अत्याचार करण्याचा अधिकार कुणाला दिलाय का? राऊतांचा सरकारला सवाल
2
चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप
3
२ किलो सोनं, १५ हिंस्त्र कुत्रे, १५ गोल्ड लोन खाती; अंथरुणात लपलेल्या मोलकरणीचा पर्दाफाश
4
"पप्पा, जगणं अवघड झालंय...", वडिलांना फोन; न्यायाधीशाने संपवलं आयुष्य, पत्नीवर गंभीर आरोप
5
"देवाभाऊंच्या राज्यात ना लाडकी बहीण सुरक्षित, ना ३-४ वर्षांची बालिका"; काँग्रेसची बोचरी टीका
6
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
7
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
8
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
9
दहीवडा खाल्ल्यानंतर उलट्या आणि ताप; २७ मुलांसह ५८ जणांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
10
समोरासमोर आले नागा चैतन्य अन् समंथा? रिसेप्शन पार्टीला आपापल्या पार्टनरसोबत लावली हजेरी
11
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
12
हे काय नवीन? मोस्ट एलिजिबल बॅचलर आदित्य रॉय कपूरला डेट करतीये तारा सुतारिया, चर्चांना उधाण
13
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
14
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
15
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
16
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
17
"त्या नराधमाचा एन्काऊन्टर झाला तरच मानू की हे सरकार...", नरसापूर घटनेनंतर प्रवीण तरडे संतापले, सरकाला दिला अल्टिमेटम
18
'बीएच' सिरीज नंबर घेतला, पण कर भरायला विसरले !मुंबईत वाहनधारकांना बसला लाखो रुपयांचा दंड
19
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
20
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

अहवाल येण्याआधीच आठ जणांना ठेवले कोवीड सेंटरमध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2020 05:00 IST

शहरातील जुना रेल्वे स्टेशन परिसरातील एका महिलेचा अहवाल दोन दिवसांपूर्वी पॉझिटिव्ह आला. त्यामुळे कुटुंबासह इतर संपर्कात आलेल्या आठ व्यक्तींचे गुरूवारी स्वॅब घेण्यात आले. तपासणी अहवाल येण्यापूर्वीच स्थानिक प्रशासनाने शुक्रवारी सकाळी ११ वाजताच्या दरम्यान सहा जणांचे गृह विलगीकरण केले तर संपर्कातील दोन महिलांना येथील कोविड केअर सेंटरमध्ये दुपारी ४ वाजतापासून ठेवण्यात आले.

ठळक मुद्देसंतापजनक । नगर परिषद प्रशासनाचा प्रताप

भोजराज गोवर्धन ।लोकमत न्यूज नेटवर्कमूल : कोरोना पॉझिटिव्ह अहवाल येण्याआधीच आठ जणांना बाधित ठरवून कोविड केअर सेंटरमध्ये ठेवल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी शहरात उघडकीस आला. या घटनेमुळे नागरिक नगर परिषद प्रशासनाविरूद्ध तीव्र संताप व्यक्त करीत आहेत.शहरातील जुना रेल्वे स्टेशन परिसरातील एका महिलेचा अहवाल दोन दिवसांपूर्वी पॉझिटिव्ह आला. त्यामुळे कुटुंबासह इतर संपर्कात आलेल्या आठ व्यक्तींचे गुरूवारी स्वॅब घेण्यात आले. तपासणी अहवाल येण्यापूर्वीच स्थानिक प्रशासनाने शुक्रवारी सकाळी ११ वाजताच्या दरम्यान सहा जणांचे गृह विलगीकरण केले तर संपर्कातील दोन महिलांना येथील कोविड केअर सेंटरमध्ये दुपारी ४ वाजतापासून ठेवण्यात आले. ज्या महिलांना भाग्यरेखा सभागृहातील कोविड केअर सेंटरमध्ये ठेवले तिथेच काही बाधित महिला होत्या. त्यामुळे निरोगी महिला बाधित होण्याची भीती व्यक्त केल्या जात आहे. निगेटिव्ह अहवाल आलेल्या महिलांना शनिवारी सकाळी प्रशासनाने घरी सोडून दिले. तालुक्यात आरटीपीसीआर व अ‍ॅन्टिजेन तपासणी केंद्र आहे. अ‍ॅन्टिजेन तपासणी अहवाल १० मिनिटात मिळतो. आरटीपीसीआर अहवाल केव्हा मिळणार हे एसएमएस किंवा अधिकाऱ्यांमार्फत सांगितले जाते. त्यामुळे अहवाल येण्यापूर्वीच महिलांना बाधित ठरविण्याचे कारण काय, असा प्रश्न कुटुंबीयांनी उपस्थित केला आहे.अहवाल येण्यापूर्वी महिलांना कोविड केअर सेंटरमध्ये ठेवण्यात आले. यामध्ये प्रशासनाचीच चूक आहे. या त्रासाबद्दल दिलगीरी व्यक्त करतो. यापुढे अशा चुका न करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या आहेत.-सिद्धार्थ मेश्राम, मुख्याधिकारी नगर परिषद, मूल

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या