शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या TVK पक्षाचा 'ब्लॉकबस्टर शो'; DMK ला जोरदार धक्का
2
West Bengal Election Result 2026: पश्चिम बंगालमध्ये बहुमतासाठी किती हवा आकडा?; भाजपा इतिहास घडवण्याच्या तयारीत
3
तामिळनाडूत प्रस्थापितांना धक्का? अभिनेते विजय यांच्या टीव्हीकेची जोरदार मुसंडी, सुरुवातीलाच एवढ्या जागांवर मिळवली आघाडी
4
West Bengal Assembly Election 2026: प. बंगालमध्ये सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपानं गाठली शंभरी; TMC सोबत अटीतटीची लढत
5
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; सेन्सेक्स ३४४ तर निफ्टीमध्ये ६६ अंकांची वाढ; 'हे' शेअर्स सुस्साट
6
'राजा शिवाजी'मध्ये शिवरायांच्या सासूच्या भूमिकेत दिसली 'ही' अभिनेत्री, पोस्ट शेअर करत म्हणाली...
7
Election Results 2026: केरळमध्ये काँग्रेस सुसाट, भाजपाचीही सात जागांवर आघाडी
8
अंगारक संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, WhatsApp Status शेअर करून बाप्पाचे आशीर्वाद सर्वांपर्यंत पोहोचवा
9
West Bengal Assembly Election: पश्चिम बंगालमध्ये निकालाच्या आदल्या रात्री काळेबेरे? ममता बॅनर्जींच्या ‘त्या’ पोस्टनं खळबळ!
10
Baramati Rahuri Results 2026: बारामतीत अपेक्षेप्रमाणे सुनेत्रा पवार यांना आघाडी, तर राहुरीचा कल काय? आहे अशी अपडेट
11
बंगालमध्ये तृणमूल-भाजपामध्ये अटीतटीची लढत, सुरुवातीच्या कलांमध्ये कुणाला आघाडी? अशी आहे आकडेवारी
12
Tamil Nadu Elections 2026: विजय थलपती ते खुशबू सुंदर... पडद्यावरच्या कलाकारांची प्रतिष्ठा पणाला, कोण मारणार बाजी?
13
भाजपासाठी पश्चिम बंगाल ठरणार 'लास्ट फ्रंटियर'; जय-पराजयाचा परिणाम 'मिशन UP' वर पडणार?
14
Post Office ची कमाई करुन देणारी स्कीम, जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹४४,९९५ चं फिक्स व्याज; मिळतेय सरकारची 'गॅरेंटी'
15
राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार?
16
'राजा शिवाजी'चं वीकेंड कलेक्शन किती? समोर आले आकडे; मराठी प्रेक्षकांची मान उंचावली
17
पश्चिम बंगालमधील या दोन मतदारसंघात 'कांटे की टक्कर', निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष
18
आजचे राशीभविष्य, ०४ मे २०२६: मिथुन, वृश्चिक, मकर राशींना धनलाभाचे संकेत; कसा असेल तुमचा दिवस?
19
पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा
20
पाऊस चोरणारे देश? अमेरिका-इस्रायलवर 'ढगचोरी'चा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

आठजणांनी केला प्लाझ्मा दान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2020 05:01 IST

कोरोना रुग्णांसाठी प्लाझ्मा थेरपी ही अनेक रूग्णांना वरदान ठरत आहे. या थेरपीत कोरोनातून बरा झालेल्या रूग्णांच्या रक्तातून काढलेल्या प्लाझ्मातील कोविड विरोधक अ‍ॅन्टीबॉडी दुसऱ्या रूग्णाला दिल्या जातात. त्यामुळे रुग्णांना या आजारातून बाहेर काढणे काही प्रमाणात का, होईना शक्य आहे.

ठळक मुद्देजनजागृतीचा परिणाम : कोरोनारूग्णांसाठी ठरणार फायदेशीर

साईनाथ कुचनकार ।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोना आजारावर सध्यातरी कोणतेही औषध उपलब्ध नसल्यामुळे प्लाझ्मा थेरपीद्वारे रुग्णांवर उपचार करून त्यांना आधार दिला जात आहे. मात्र, प्राझ्मा दान दिल्यामुळे अशक्तपणा येत असल्याच्या गैरसमजाने प्लाझ्मा दान करण्यासाठी कोणीच समोर येत नव्हते. परिणामी आरोग्य यंत्रणेचा ताण वाढला होता. मात्र, मागील महिनाभरात जिल्ह्यात आठ जणांनी प्लाझ्मा दान केले आहे. यामुळे कोरोनाच्या गंभीर रुग्णांना दिलासा मिळाला आहे.कोरोना रुग्णांसाठी प्लाझ्मा थेरपी ही अनेक रूग्णांना वरदान ठरत आहे. या थेरपीत कोरोनातून बरा झालेल्या रूग्णांच्या रक्तातून काढलेल्या प्लाझ्मातील कोविड विरोधक अ‍ॅन्टीबॉडी दुसऱ्या रूग्णाला दिल्या जातात. त्यामुळे रुग्णांना या आजारातून बाहेर काढणे काही प्रमाणात का, होईना शक्य आहे. मात्र प्लाझ्मा दान करण्यासाठी कोरोनातून बरे झालेले रुग्ण समोर येत नसल्यामुळे गंभीर रुग्णांवर याद्वारे उपचार करणे जिल्ह्यात सध्यातरी अशक्य होते.एका प्लाझ्मा दानातून दोन रूग्ण बरे होऊ शकतात. त्यामुळे अधिकाधिक प्लाझ्मा दान करणे गरजेचे आहे. जिल्हा सामान्य रक्तपेढीत आतापर्यंत कोरोनातून बरे झालेल्या आठ दाते समोर आले असून त्यांनी प्लाझ्मा दान केले आहे.सुरूवातीला प्लाझ्मा दान करण्याबाबत भीतीचे वातावरण होते. प्लाझ्मा दान केल्यामुळे अशक्तपणा तर येणार नाही ना, प्लाझ्मा दिल्यानंतर कोरोना झाला तर काय करायचे, प्लाझ्मा म्हणजे नेमके काय असे अनेक प्रश्न दात्यांना पडले आहे. यातील काहींची शंका निरसन करणे आरोग्य यंत्रणेला शक्य झाल्यामुळे प्लाझ्मा दान करणाऱ्यांची संख्या जिल्ह्यात हळुहळू वाढत आहे. मागील महिनाभरात आठ जणांना प्लाझ्मा दान करून आपले कर्तव्य बजावले आहे. रक्तदान शिबिरासारखेच आता आरोग्य विभाग तसेच काही सामाजिक संस्था प्लाझ्मा दान करण्यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती करीत आहे. त्याचाच परिणाम आता पडत असून कोरोनातून बरे झालेले रुग्ण प्लाझ्मा दान करण्यासाठी समोर येत आहेत.कोरोनाचा संसर्गामुळे जिल्हावासीय घाबरले आहे. अशातच जिल्ह्यात आतापर्यंत नऊ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. अशावेळी गंभीर रुग्णांना प्लाझ्मा देण्याची तयार आरोग्य विभागाने सुरू केली आहे.जनजागृतीमुळे डोनर आले समोरकोरोना आजारावर सध्यातरी कोणतीही लस उपलब्ध नाही. यासाठी शास्त्रज्ञ दिवसरात्र एक करून लस शोधण्याचे काम करीत आहेत. मात्र ती रुग्णांपर्यंत केव्हा पोहचेल हे अद्यापतरी सांगता येत नाही. त्यामुळे कोरोनाच्या गंभीर रुग्णाला या आजारातून बाहेर काढण्यासाठी प्लाझ्मा थेरपी उपयुक्त ठरत आहे. यासाठी आरोग्य विभाग त्यादृष्टीने प्रयत्न करीत असुन मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जात आहे. यामुळे जिल्ह्यात मागील काही दिवसात प्लाझ्मा डोनर समोर येत असून त्यांनी निसंकोचपणे प्लाझ्मा दान केले आहे.मागील काही दिवसामध्ये प्लाझ्मा थेपरीसंदर्भात जनजागृती केली जात आहे. त्यामुळे हळूहळू डोनर समोर येत आहे. एका महिन्यामध्ये चंद्रपूरमध्ये आठ जणांना प्लाझ्मा दान केले आहे. कोरोनाच्या रुग्णांना या आजारातून बाहेर काढण्यासाठी जिल्ह्यातील अन्य नागरिकांनीही समोर येणे गरजेचे आहे.- डॉ. अमित प्रेमचंद, प्रभारी ब्लड बँक अधिकारी,जिल्हा सामान्य रुग्णालय, चंद्रपूरराज्य शासनाने कोरोनाच्या उपचारासाठी रूग्णालयांना प्लाझ्मा थेरपी या उपचार पध्दतीचा वापर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे जिल्हा आरोग्य विभागानेही तयारी सुरु केली आहे. सध्यातरी जिल्ह्यात एकाही रुग्णाला प्लाझ्मा थेरपी करण्यात आली नाही. मात्र प्लाझ्मा डोनरने प्लाझ्मा दान करून आपले कर्तव्य पार पडले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या