शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
3
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
4
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
5
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
6
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
7
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
8
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
9
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
10
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
11
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
12
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
13
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
14
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
15
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
16
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
17
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
18
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
19
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
20
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
Daily Top 2Weekly Top 5

आक्सापुरात जादूटोण्यावरून गावकऱ्यांत संशयकल्लोळ

By admin | Updated: December 17, 2015 01:13 IST

कोठारी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या आक्सापूर येथे मांत्रिकाने जादूटोणा करून गावातील इसमांचा जीव घेण्याचा प्रयत्न करीत आहे.

कोठारी : कोठारी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या आक्सापूर येथे मांत्रिकाने जादूटोणा करून गावातील इसमांचा जीव घेण्याचा प्रयत्न करीत आहे. जादू-करणी केल्यामुळेच गावातील तिघांचा मृत्यू झाला, असा कयास गावकऱ्यांनी लावला व गावातील वातावरण गढूळ झाले. करणी करण्याचा संशय असलेले कुटूंब व ज्यांचा जादूवर विश्वास आहे, असे गावकरी एकमेकांसमोर उभे ठाकले. त्यामुळे आक्सापुरात सद्या जादूटोण्याच्या वादावरून संशयकल्लोळ निर्माण झाला आहे. गावकरी भयग्रस्त असून पोलीस ठाण्यात येवून आपबिती कथन करीत आहेत.मागील महिनाभरापासून आक्सापुरात वेगवेगळ्या कारणाने तीन इसमांचा मृत्यू झाला. अचानक गावात मृत्यूचे सत्र सुरू झाल्याने गावकरी भयभीत झाले. त्यात काही गावकऱ्यांना मृत्यूचे कारण जादू-करणी असल्याचा प्रकार एका मांत्रिकाने सांगितला. गावकऱ्यांनी त्यावर विश्वास करीत भांडणाला सुरूवात केली. त्यात एकमेकांवर आरोप करीत मारपीठ केली. या प्रकाराची माहिती कोठारी पोलीस ठाण्याचे ठाणेदार अरविंदकुमार कतलाम यांनी दिली. ठाणेदारांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून गावकऱ्यांना पोलीस ठाण्यात बोलाविले. गावातील तथाकथित मंडळी व प्रतिष्ठीतांची सर्व गावकऱ्यांसमवेत बैठक आयोजित केली. त्यात कोठारी येथील जादूचे प्रयोग करणारे व अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ता जुनघरे मामा व ठाणेदार अरविंदकुमार कतलाम यांनी उपस्थित गावकऱ्यांना अंधश्रध्देबाबत मार्गदर्शन केले. जुनघरे यांनी विविध प्रयोग सादर करून गावकऱ्यांच्या मनात असलेले भयग्रस्त वातावरण व भ्रामक कल्पनांना उजाळा देत सखोल मार्गदर्शन केले. यापुढे आक्सापुरात अंधश्रद्धा निर्मुलनाच्या तज्ञांचा प्रबोधनात्मक कार्यक्रम घेवून गावकऱ्यांच्या मनातील भ्रामक कल्पना दूर करण्यासाठी प्रबोधन केल्या जाईल असे सांगितले. ठाणेदाराच्या समयसुचकतेने आक्सापुरात उद्भवणाऱ्या प्रसंगावर वेळीच उपाय करण्यात यश मिळाले आहे. यापुढे गावात कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही, याची दक्षता पोलीस विभागाकडून घेतल्या जात असून नागरिकांवर लक्ष ठेवून आहेत. (वार्ताहर)