शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
5
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
6
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
7
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
8
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
9
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
10
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
11
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
12
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
13
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
14
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
15
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
16
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
17
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
18
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
19
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
20
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
Daily Top 2Weekly Top 5

रखरखत्या उन्हात प्रवाशांचा एसटी बसला दे धक्का !

By admin | Updated: June 1, 2015 01:22 IST

सूर्य आग ओकत असताना जनतेच्या जिव्हाळ्याची मानली जाणारी एसटी बसही यापासून सुटलेली नाही.

वरोरा : सूर्य आग ओकत असताना जनतेच्या जिव्हाळ्याची मानली जाणारी एसटी बसही यापासून सुटलेली नाही. बसने बहुसंख्य नागरिक प्रवास करीत असताना रखरखत्या उन्हात एसटी बस रस्त्यावर अचानक बंद पडली. त्यामुळे प्रवाशांना वाहक व चालकांनी खाली उतरून एसटीला धक्का मारण्याची विनंती केली. प्रवास करायचा आहे तर धक्का मारावाच लागेच असे म्हणत शरीराची लाही करीत अखेर प्रवाशांच्या महत्प्रयासाने बस सुरू झाली अन् पुढच्या प्रवाशाला निघाली.राजुरा आगाराची एमएच ०७ सी ९५३८ या क्रमांकाची एसटी बस राजुरा येथून यवतमाळकडे रविवारी सकाळी निघाली. एसटी बस प्रवाशाने खचाखच भरली होती. सकाळी ११ वाजताच्या सुमारास सदर एसटी बस वरोरा येथील रत्नमाला चौकात उभी राहून वरोरा येथील प्रवाशांना उतरवत असताना प्रवाशांची चढ-उतार झाल्यानंतर महिला वाहकाने एसटी बस सुरू करण्याकरिता द्वार बंद केला. बस पुढे नेण्याची सूचना चालकास दिली. चालकाने बस सुरू करण्याचा प्रयत्न केला. परंतु चालकाला एसटी बस सुरू होईना. उष्ण तापमानामुळे एसटी बसमधील प्रवासी कंटाळले तेवढ्यात एसटी महिला वाहक व चालकाने एसटी प्रवाशांना बसला धक्का मारण्याची विनंती केली. प्रवासी तातडीने खाली उतरले व एसटी बसला मागून व पुढून धक्का मारण्यास भर उन्हात सुरुवात केली. धक्का मारणारे प्रवाशी घामाने ओलेचिंब झाले. अखेर महत्प्रयासाने एसटी बस प्रवाशांच्या धक्क्याने सुरू झाली आणि प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. एसटी बसने शेकडो प्रवासी प्रवास करतात. मात्र तापमानामुळे बसला प्रवासात धक्का मारण्याची शिक्षा भर उन्हात मिळाली. (तालुका प्रतिनिधी)