शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

पावसाअभावी पिकांची वाढ खुंटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2018 22:58 IST

गेल्या १५ ते २० दिवसांपासून पाऊस बेपत्ता असल्याने शेतपिकांची वाढ पूर्णत: खुंटली आहे. एकीकडे हरीतक्रांतीचे स्वप्न पाहतअसताना निसर्ग शेतकऱ्यांना साथ देत नसल्याने शेतीवर अवकळा येत आहे. आता आॅगस्ट महिन्यातच पाऊस बेपत्ता झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. पावसाअभावी यावर्षी उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होऊन त्याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देपाऊस बेपत्ता : निसर्ग शेतकऱ्यांना साथ देईना

लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी : गेल्या १५ ते २० दिवसांपासून पाऊस बेपत्ता असल्याने शेतपिकांची वाढ पूर्णत: खुंटली आहे. एकीकडे हरीतक्रांतीचे स्वप्न पाहतअसताना निसर्ग शेतकऱ्यांना साथ देत नसल्याने शेतीवर अवकळा येत आहे. आता आॅगस्ट महिन्यातच पाऊस बेपत्ता झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. पावसाअभावी यावर्षी उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होऊन त्याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.शेतीला पावसाची नितांत गरज असताना पावसाने ऐनवेळी हुलकावणी दिली आहे. दहा-पंधरा दिवस दमदार पाऊस पडल्यानंतर नदी, नाले, ओसडूंन वाहू लागले होते. काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली होती. यात काही भागात शेतीला मोठा फटका बसला होता. मात्र आता पावसाने दडी मारल्याने पावसाअभावी शेतीच संकटात सापडली आहे. आॅगस्ट महिन्याचा आठवडा उलटला आहे. दरवर्षी या महिन्यात चांगलाच पाऊस पडतो. परंतु, पाऊस दिवसेंदिवस शेतकºयांना हुलकावणी देत असल्याने शेतकºयांची चिंता वाढली आहे.पाऊस नसल्याने पिकांची वाढ पूर्णत: खुंटली आहे. त्यामुळे उत्पादनावर त्याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता असून उत्पादनात यावर्षी घट झाली तर शेतकरी पुन्हा कर्जाच्या कचाट्यात सापडेल, अशी शक्यता आहे. निसर्गाच्या पाण्यावर शेती करण्याचे दिवस आता जवळजवळ संपत आले आहे. निसर्ग शेतकºयांना साथ देत नाही. त्यामुळे कृषीक्षेत्रावर मोठ्या प्रमाणात अवकळा आली आहे.पिक वाढणार नाही तर उत्पादन होणार कसे, अशी शेतकºयांना चिंता आहे. त्यामुळे प्रत्येक शेतकºयाला पावसाची प्रतीक्षा लागली आहे.कसे पूर्ण होणार हरितक्रांतीचे स्वप्न?निसर्गाचा असा लहरीपणा कायम राहिल्यास त्याचा मोठा परिणाम शेतीवर होणार आहे. शेतकरी सुखी, समृद्धी होण्यासाठी शेतीची भरभराट होणे आवश्यक आहे. परंतु, निसर्ग शेतकºयांना साथ देत नसल्याने व सिंचनाची अपूरी सुविधा असल्याने दिवसेंदिवस शेतकरी कर्जबाजारी होत आहे.शेतकºयांना पावसाची प्रतीक्षाचआॅगस्ट महिना आला तरी शेतकºयांना अजूनही पाऊस बेपत्ता असल्याने पिकांच्या वाढीकरिता पाण्याची नितांत गरज आहे. परंतु, पाऊस येत नसल्याने शेतकºयांना पावसाची प्रतीक्षाच करावी लागत आहे.धानपिकांवरही दुष्काळाचे सावट ; रोवणी खोळंबलीमारोडा : मूल परिसरात गेल्या १५ दिवसांपासून पावसाचा पत्ता नसल्याने धानपिकांवर दुष्काळाचे सावट पसरले आहे. सुरू झालेले रोवणीची कामे खोळंबल्याने शेतकºयांची चिंता वाढली आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाचा पत्ता नाही. पंधरा दिवसांपुर्वी पडलेल्या पावसाने कसे-बसे रोवणीचे काम आजपर्यंत सुरू होते. परंतु, आता पाणी आटले असून ज्यांच्याकडे मोटारपंप आहे, त्यांना विजेशी संघर्ष करुन रोवणीची कामे करावी लागत आहेत. परंतु जी शेती उंचवट्यावर व नहराच्या कालव्यांशी आहे, त्यांचे शेत कोरडे पडत आहे. चार दिवसापूर्वी मजूर मिळत नव्हते. आता शेतात पाणीच नसल्याने संकट उभे ठाकले आहे. या परिसरात धान हे मुख्य पीक असून अनेक शेतकºयांची चिंता वाढली आहे.