शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
3
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
4
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
5
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
6
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
7
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
8
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
9
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
10
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
11
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
12
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
13
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
14
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
15
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
16
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
17
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
18
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
19
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
20
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
Daily Top 2Weekly Top 5

घर बांधकामाचे स्वप्न महागले

By admin | Updated: April 2, 2016 00:43 IST

यावर्षीच्या दुष्काळी परिस्थितीमुळे रेडीरेकनरच्या (वार्षिक बाजार मूल्य) दरात फारशी वाढ होणार नाही, असे आश्वासन शासनाने दिले होते.

रेडीरेकनरच्या दरात सात टक्के वाढ : महात्मा गांधी मार्गावरील क्षेत्र सर्वाधिक महागडेमंगेश भांडेकरचंद्रपूरयावर्षीच्या दुष्काळी परिस्थितीमुळे रेडीरेकनरच्या (वार्षिक बाजार मूल्य) दरात फारशी वाढ होणार नाही, असे आश्वासन शासनाने दिले होते. १ एप्रिलला रेडीरेकनरचे दर जाहीर झाले असून चंद्रपूर जिल्ह्यासाठी ६.६४ एवढी सरासरी वाढ करण्यात आली आहे. ही वाढ साधारण असली तरी राज्यातील मोठ्या महानगर पालिकांच्या तुलनेत अधिक आहे. त्यामुळे आता चंद्रपुरात घर बांधण्यासाठी अधिक पैसे मोजावे लागणार असून महात्मा गांधी मार्गावर घर बांधण्याचे स्वप्न जास्त महागडे ठरणार आहे. राज्य शासनाकडून यापुर्वी नव्या वर्षाच्या सुरूवातीला म्हणजे १ जानेवारीला रेडीरेकनरचे दर घोषीत व्हायचे. मात्र यावर्षी जुन्या दरांंना तीन महिन्याची मुदतवाढ देऊन १ एप्रिल म्हणजे नव्या आर्थिक वर्षाच्या सुरूवातीला दर घोषीत केले. यापुढे दरवर्षी नव्या आर्थिक वर्षालाच रेडीरेकनरचे दर जाहीर होणार आहेत. १ एप्रिलला जाहीर केलेल्या रेडीरेकनरच्या दरात चंद्रपूर जिल्ह्यासाठी सरासरी ७ टक्क्यांनी वाढ केली आहे. त्यामुळे या सर्वसाधारण दरवाढीचा अडथळा दूर करूनच घर, प्लॉट, जमीन खरेदी करावी लागणार आहे. रेडीरेकनरच्या दरानुसार चंद्रपूर शहरात सर्वाधिक महागाई असलेला भाग महात्मा गांधी मार्ग असून सर्वात स्वस्त भाग कॉलरी क्षेत्र आहे. नवीन दरवाढ लागू झाली असून घर, जमीन, दुकान खरेदी मुद्रांकाचा खर्च खरेदीदारांनाच करावा लागणार आहे. त्यामुळे त्यांना याचा फटका बसणार आहे. खुली जमीन, निवासी इमारत, वरचा मजला, तळ मजला, व्यावसायिक दुकान चाळीचे दर वाढले असल्याने ग्राहकांचीच चांगलीच कसरत होणार आहे. नव्या दरानुसार जिल्हा निबंधक कार्यालयात दर आकारले जात आहेत. यावर्षी अत्यल्प पाऊस पडला. त्यामुळे कोरड्या दुष्काळाची स्थिती राज्यात व जिल्ह्यात आहे. त्यामुळे यावर्षी दर वाढणार नाही अशी आशा होती व तसे शासनानेही आश्वासन दिले होते. मात्र सरासरी ७ टक्के दरवाढ केल्याने अनेकांचे गणित बिघडणार आहे.चंद्रपूर जिल्ह्यात ही दरवाढ सरासरी ७ टक्के असली तर नागपूर, उल्हासनगर, भिवंडी, वसई-विरार महानगर पालिका क्षेत्रात ३ टक्के, नवी मुंबई पालिका क्षेत्रात ४ टक्के व पुणे महानगरपालिका क्षेत्रात ६ टक्के वाढ करण्यात आली आहे. अनेकांनी घर बांधकाम व जागा घेण्याचे नियोजन केले. मात्र, राज्य शासनाने रेडीरेकनरचे दर वाढविल्याने स्वप्न प्रत्यक्षात पूर्ण करण्यासाठी चांगलीच कसरत करावी लागणार आहे. प्रॉपर्टी डिलर्सची चांदीप्लॉट खरेदी-विक्रीच्या व्यवसायातून रातोरात लखपती होण्याची किमया अनेकांनी साधली आहे. प्लॉट, घर खरेदी-विक्री करताना अनामत रक्कम देवून नोंदणीकृत खरेदीखत केले जाते. या खरेदीच्या आधारे आणखी तीन व्यवहार ग्राह्य मानले जातात. ही बाब लक्षात घेता, हे व्यावसायिक एखाद्याच्या मालमत्तेचे खरेदीखत करून त्या मुदतीत गरजू ग्राहक शोधतात. खरेदी केलेल्या दरापेक्षा एक ते दीडपट अधिक नफा कमावून सदर मालमत्तेचे हस्तांतरण केले जाते. खरेदी-विक्रीत कोणतीही गुंतवणूक न करता विकणारा व विकत घेणाऱ्या व्यक्तीशी समन्वय साधून कमीशन तसेच दरातील तफावतीची रक्कम लाखोंच्या घरात जाते. त्यामुळे खरेदी-विक्रीतून कोणाला नफा होवो अथवा न होवो प्लॉट व्यावसायिकांची चांदी होते. या व्यवसायातील नफा लक्षात घेता अनेकांनी हा व्यवसाय जोडधंदा म्हणून सुरु केला आहे.दर घोषित होण्यापूर्वी सर्वाधिक व्यवहारबँका गृहकर्ज करताना स्टॅम ड्युटीसाठी सरकारी दर आधार मानतात. त्यामुळे रेडीरेकनरच्या दराचा परिणाम बाजारपेठेवरही होतो. दरवर्षी या दरात २० ते २२ टक्यांनी वाढ केली जाते. मात्र यावर्षी जुन्या दरांना तीन महिन्याची मुदतवाढ देण्यात आली होती. नव्या आर्थिक वर्षात दर वाढणार आहे, अशी ज्यांना कल्पना होती त्यांनी त्यांनी फेब्रुवारी व मार्च महिन्यातच व्यवहार उरकून घेतले आहे. त्यामुळे वर्षभराच्या तुलनेत मार्च महिन्यात जिल्हाभरात सर्वाधिक व्यवहार झाल्याची माहिती सह जिल्हा निबंधक कार्यालयाने दिली आहे. शासनाने घोषित केलेल्या नव्या दरानुसार १ एप्रिलपासून खरेदी-विक्रीचे व्यवहार सुरू झाले आहेत. व्यावसायिक क्षेत्र असलेल्या भागासाठी बाजार मुल्य जास्त असून दरवर्षी रेडीरेकनरच्या दरात १५ ते २० टक्के वाढ केली जात होती. मात्र यावर्षीचे दर त्या मानाने कमी आहेत.- अनुप हांडे, सह जिल्हा निबंधक, वर्ग-१ (निम्न श्रेणी) चंद्रपूर.