शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: महिला आरक्षण विधेयक देशाची दिशा अन् दशा ठरवणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
4
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
5
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
6
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
7
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
8
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
9
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
10
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
11
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
12
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
13
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
14
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
15
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
16
IPL 2026: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
17
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
18
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
19
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
20
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
Daily Top 2Weekly Top 5

धम्मचक्र अनुप्रवर्तन समारंभाची जय्यत तयारी

By admin | Updated: October 14, 2015 01:22 IST

येथील दीक्षाभूमीवर ५९ वा धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन साजरा करण्यात येणार आहे.

मिरवणूक आराखडा : १५ व १६ आॅक्टोबरला दीक्षाभूमीवर विविध कार्यक्रमांचे आयोजनचंद्रपूर : येथील दीक्षाभूमीवर ५९ वा धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमीत्त्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरिअल सोसायटीतर्फे धम्मचक्र अनुप्रवर्तन समारंभातील १५ व १६ आॅक्टोबरच्या वाहन व अस्थिधातुरथ मिरवणुकीची रुपरेषा ठरविलेली आहे. त्यानुसार सहकार्य करून मिरवणुकीत शुभ्रवस्त्र धारण करुन शांतीमयरित्या सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.१५ आॅक्टोबरला सायंकाळी ५ वाजता चंद्रपूर शहराच्या मध्यभागी स्थित प.पू. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करुन विश्वशांती बंधुत्वप्रेरीत वाहनासह मिरवणुकीला आरंभ होईल. मिरवणुकीच्या अग्रभागी सदिच्छा फलक ठेवून वाहनचालक, आयोजकांची वाहने त्या मागे दोन दोनच्या रांगेत समाजबांधव राहतील, बौद्ध व आंबेडकरी अनुयायी, मधोमध लाऊडस्पिकर धारक आॅटो राहणार असून ही मिरवणुक जटपुरा गेट, प्रियदर्शिनी चौक, वरोरा नाका ते दीक्षाभूमी अशी मार्गक्रमण करेल.१६ आॅक्टोबरला प.पू. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्यापासून सकाळी १० वाजता मिरवणुकीला सुरुवात होईल. मिरवणुकीचे मुख्य आकर्षण तथागत भगवान बुद्धाचा पवित्र अस्थिधांतुचा कलश तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थिकलशासह सर्व पूज्यनिय भंत असतील, अस्थिकलश रथाच्या पुढे आयोजकांनी ठरविलेल्या नियोजनानुसार समता सैनिक दलाचे शौर्यशिल सैनिक असतील, त्यानंतर अस्थिकलश रथ असेल आणि त्यामागे आयोजन समितीचे सर्व पदाधिकारी व सदस्य असतील. त्यानंतर बौद्ध उपासक व उपासिका व त्यानंतर उर्वरित समता सैनिक दल असतील, मिरवणुकीच्या दोन्ही बाजूला भारतीय बौद्ध महासभेने नियोजित केलेले कार्यकर्ते तसेच डॉ. आंबेडकर महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व कर्मचारी यांची मानवी साखळी असेल. ही मिरवणूक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून निघून आझाद बगीच्या येथील महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी थांबेल, त्यानंतर बॅरि. राजाभाऊ खोबरागडे यांच्या पुतळ्याला अभिवादन करुन ही मिरवणूक जटपुरा गेट ते प्रियदर्शिनी चौक ते वरोरा नाका ते दीक्षाभूमी अशी मार्गक्रमण करेल. समता सैनिक दलाचे सर्व सैनिक दीक्षाभूमीवर एकदाच व एकत्रित सलामी देतील, असे कळविले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)