शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज्यातून १ कोटी सह्या घेणार, काँग्रेसचा महिला विरोधी चेहरा उघड करू”: CM देवेंद्र फडणवीस
2
“२ लाख ७० हजाराचा रेकॉर्ड मोडायचा, बारामती निवडणूक बिनविरोध व्हायला हवी होती पण…”: पार्थ पवार
3
कियाने पुन्हा लाँच केली न खपणारी कार, गेल्या महिन्यात ५९ पण विकल्या नव्हत्या, ५०० चा आकडा गाठतानाही...
4
जम्मू-काश्मीरच्या उधमपूरमध्ये बसचा भीषण अपघात; १५ जणांचा मृत्यू, अनेक प्रवासी गंभीर जखमी
5
Latest Marathi News LIVE Updates: विरोधकांनी महिला आरक्षण विधेयकाची भ्रूणहत्या केली, फडणवीसांचा घणाघात
6
Ashok Kharat : "...तर नागदेवता तुझ्या मुलास दंश करेल"; भोंदू अशोक खरातने महिलेला दाखवलेली भीती
7
लेकीला कडेवर घेऊन पाऊण तास उभा, १०० रिक्षांना हात दाखवला तरीही...; डोंबिवलीतील व्हिडीओ व्हायरल
8
हैवान! पित्याने आपल्या ७ मुलांना झोपेतच संपवलं, चार मुलं स्वत:च्या पत्नीपासून तर तीन मुलं...
9
“तुम्ही ७५ काय, १७५ वर्षे आरक्षण घ्या, आम्हाला गरज नाही”; बृजभूषण शरण सिंह यांचा रोख कुणाकडे?
10
मध्यस्थीच्या नावाखाली ‘वसुली’ करण्याचा पाकचा मोठा डाव; पूर्वीही दोनदा असेच खिसे भरून घेतलेत!
11
Chanakya Niti: आचार्य चाणक्य म्हणतात, 'या' मानसिकतेमुळे लक्ष्मी पाठ फिरवते! तुम्ही तर ही चूक करत नाही ना?
12
Mamata Banerjee : "नाव, पत्ता सगळं माहित आहे, हिशोब तर होणारच!"; ममता बॅनर्जींची अधिकाऱ्यांना थेट धमकी
13
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खानने ११ एप्रिलला घेतले मुंब्र्यात उपचार; जामीन अर्जावर आज सुनावणी
14
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
15
MSRTC: एसटी आगार, परिसर स्वच्छतेचा करोडोंचा खर्च प्रवाशांच्या माथी
16
Avinash Bhosale: बिल्डर अविनाश भोसले यांना दिलासा; मालमत्तांवरील कारवाई रद्द
17
अतिवृष्टीचा इशारा; पिके चांगली पण रोगराई, नासाडीची भीती; भेंडवळ घटमांडणीचे यंदाचे भाकीत
18
आयआयटीच्या नावाखाली कोट्यवधींची फसवणूक, राज्यातील शैक्षणिक संस्थांना सावधानीचा इशारा
19
सोन्याचे दर ₹१,५०० हून अधिकने कोसळले; तर चांदीही ₹५,००० ने स्वस्त; पुढे काय..?
20
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
Daily Top 2Weekly Top 5

डाॅ. शीतल आमटेंच्या मृत्यूस कारणीभूत औषध पोलिसांच्या हाती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:56 IST

चंद्रपूर : डाॅ. शीतल आमटे यांच्या मृत्यूस कारणीभूत औषधीसह न वापरलेले इंजेक्शन व गोळ्या पोलिसांच्या हाती लागल्या आहेत. ही ...

चंद्रपूर : डाॅ. शीतल आमटे यांच्या मृत्यूस कारणीभूत औषधीसह न वापरलेले इंजेक्शन व गोळ्या पोलिसांच्या हाती लागल्या आहेत. ही कळी जुळते वा जप्त केलेले औषध व डाॅ. शीतल यांच्या व्हिसेरातील नमुने जुळते वा नाही हे तपासण्यासाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळेमध्ये पाठविले आहे. डाॅ. शीतल यांची आत्महत्याच असावी, या निष्कर्षापर्यंत तपास पोहचला असला तरी यासाठी अहवालाकडे पोलिसांचे लक्ष लागून आहे, अशी माहिती विश्वसनीय पोलीस सूत्राने ‘लोकमत’ला दिली.

याशिवाय पोलिसांना काही महत्त्वपूर्ण धागेदोरे गवसले आहे. त्याची पडताळणी केल्यानंतर पोलीस डाॅ. शीतल मृत्यूबाबत खुलासा करतील, असे पोलीस सूत्राचे म्हणणे आहे. बुधवारी पोलिसांनी डाॅ. शीतल यांच्या मृत्यूदरम्यान तिच्या संपर्कात आलेले पती गौतम करजगी, सासू सुहासिनी करजगी व सासरे शिरीष करजगी यांच्यासह दोन नोकरांचे जबाब नोंदवले आहे. यातून पोलिसांनी एकूणच घटनाक्रम समजून घेतला आहे. चौकशीदरम्यान पोलिसांना डाॅ. शीतल यांच्या खोलीत एक औषध आढळले. हे औषध गुंगीचे असावे, अशी शक्यताही पोलीस सूत्राने वर्तविली आहे. हे औषध डाॅ. शीतलच्या व्हिसेराच्या नमुन्याशी जुळते का, या औषधाची किती मात्रा शरीरात गेल्यास मृत्यू होऊ शकतो, किती वेळात मृत्यू होतो, याचाही शोध पोलीस घेत आहेत. सुमारे २५ ते ३० गोळ्याही आढळल्या आहेत. ही बाबही तपासाच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जात आहे.

बाॅक्स

मोबाईलमध्ये सुसाईड नोट असण्याची शक्यता

डाॅ. शीतल आमटे यांनी आत्महत्या केली असेल तर त्यांनी सुसाईड नोट लिहून ठेवली असती. परंतु आतापर्यंतच्या तपासात ती कुठेही आढळली नाही. जप्त केलेल्या मोबाईल, टॅब वा लॅपटाॅपमध्ये सुसाईड नोट असण्याची दाट शक्यता आहे. यातूनच मृत्यूमागील कारणांचाही उलगडा होईल, अशी पोलिसांना आशा आहे. डाॅ. शीतल यांनी पासवर्ड बदलल्यामुळे यातील डेटा अद्याप पोलिसांच्या हाती लागला नाही. पासवर्ड काढण्यासाठी मोबाईल, टॅब व लॅपटाॅप मुंबईच्या सायबर सेलमधील तज्ज्ञांकडे पाठविला आहे. पासवर्ड काढताना कोणताही डेटा डिलीट होऊ नये, याची खबरदारी घेणाच्या सूचना सायबर सेलला दिल्याचे समजते. मुंबईतील सायबर सेलला हे शक्य न झाल्यास ते हैदराबादला पाठविण्याची पोलिसांची तयारी आहे.

आत्महत्येचा नेमका शोध घेण्याचे आव्हान

डाॅ. शीतल यांनी आत्महत्याच केली असावी, असे पोलिसांना एकूण तपासावरून दिसून येत आहे. ही बाब न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या अहवालावरून स्पष्ट होईल, असे पोलिसांना वाटत आहे. ही बाब एकदा निष्पन्न झाल्यानंतर आत्महत्येमागील नेमक्या कारणांचा शोध पोलीस घेणार आहे. कौटुंबिक कलहातून आत्महत्या केली वा अन्य कारणाने या दिशेनेही पोलीस तपास करीत असल्याचे समजते.

डाॅ. शीतल आमटे ही मोठी व्यक्ती असल्याने या प्रकरणाकडे आनंदवनाशी जुळलेल्या प्रत्येक घटकाचे लक्ष लागलेले आहे. यामुळे तपासात कोणतीही उणीव राहू नये, याची खबरदारी म्हणून पोलीस अधीक्षक अरविंद साळवे तपासावर बारीक लक्ष ठेवून आहेत. क्षणाक्षणाला तपासाबाबत माहिती घेत आहेत.

कोट

डाॅ. शीतल आमटे यांच्या मृत्यूबाबतचा तपास योग्य दिशेने सुरू आहे. आत्महत्या असावी, असे एकूणच तपासावरून दिसून येत आहे. परंतु फाॅरेन्सिक लॅबचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच ही बाब स्पष्ट होईल. तपासातून एकही कळी सुटू नये, याची खबरदारी घेत आहोत. काही महत्त्वाचे पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहे. त्याचा सर्व बाजूने उलगडा झाल्यानंतरच खुलासा होणार आहे.

- अरविंद साळवे, पोलीस अधीक्षक, चंद्रपूर.