चायनिज खाताय की पोटाच्या आजारांना निमंत्रण देताय?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:31 IST2021-09-22T04:31:41+5:302021-09-22T04:31:41+5:30
चंद्रपूर शहरातील विविध चौकांमध्ये मोठ्या प्रमाणात चायनिज ठेले लावले जाते. तरुणांसह अनेक महिलाही मोठ्या आवडीने चायनिज पदार्थ खातात. ५० ...

चायनिज खाताय की पोटाच्या आजारांना निमंत्रण देताय?
चंद्रपूर शहरातील विविध चौकांमध्ये मोठ्या प्रमाणात चायनिज ठेले लावले जाते. तरुणांसह अनेक महिलाही मोठ्या आवडीने चायनिज पदार्थ खातात. ५० रुपयांपासून तर १८० ते २०० रुपये प्रतिप्लेटप्रमाणे चायनिज पदार्थ विकल्या जाते. खाण्यासाठी अतिशय चवदार असलेले चायनिज पोटासाठी मात्र अत्यंत घातक आहे. त्यामुळे चायनिज खाण्यापूर्वी एकदा पोटाचा विचार करून खाल्लेले बरे. पदार्थ चविष्ट होण्याकरिता मिठासारखे दिसणाऱ्या अजिनोमोटोचा टेस्टिंग पावडर म्हणून वापर केला जातो. याचा अतिप्रमाणात सेवन केल्यास आतड्याचे पोटाचे, कर्करोगसुद्धा होण्याची शक्यता असल्याचे मत डाॅक्टरांनी वर्तविले.
बाॅक्स
काय आहे अजिनोमोटो?
अजिनोमोटोला मोनो सोडियम ग्यूटामिट (एमएसजी) असे म्हणतात. तज्ज्ञानुसार ग्लूटामिट ॲसिडचे ते सोडियम मीठ आहे. हे नैसर्गिकरित्या पदार्थ वापरून निर्मित केलेले रासायनिक उत्पादन आहे.
बाॅक्स
म्हणून चायनिज खाणे टाळा
पोटात जाणारे चविष्ट चायनिज पदार्थात अजिनोमोटोचा अतिप्रमाणात वापर केला जात असल्यामुळे पोटाचे विकास होते. अनेक हाॅटेलमध्येही व्हेज, नाॅनव्हेज पदार्थामध्येही याचा वापर केला जातो. मात्र अतिवापरामुळे पोटाचे आजार होण्याची शक्यता आहे.
कोट
अजिनोमोटोयुक्त अन्न पदार्थ सेवन केल्यास पोटाचे विकास होतात. आतड्यांसाठी ते अत्यंत घातक आहे. यामुळे याचा वापर टाळणेच हिताचे आहे.
डाॅ. गोपाल मुंधडा
बालरोग तज्ज्ञ चंद्रपूर