शहरं
Join us  
Trending Stories
1
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
3
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
4
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
5
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
6
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
7
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
8
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
9
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
10
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
11
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
12
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
13
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
14
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
15
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
16
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
17
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
18
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
19
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
20
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
Daily Top 2Weekly Top 5

विनापरवाना दुकाने उघडू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2020 05:01 IST

चंद्रपूर जिल्ह्यात अद्याप एकही पॉझिटिव्ह रूग्ण नाही. मात्र, नागपूर व यवतमाळ जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रूग्णांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे दोन्ही जिल्ह्याच्या सीमा सील करण्यात आल्या. कोणीही प्रवेश केल्यास १४ दिवस क्वारंन्टाईन केले जात आहे. त्यामुळे यातल्या प्रत्येक नागरिकांनी प्रशासनासोबत डोळ्यात तेल घालून यामध्ये एकही चूक होणार नाही, याची दक्षता घ्यावी.

ठळक मुद्देकुणाल खेमनार । ३ मे पर्यंत लॉकडाऊन काटेकोर पाळा अन्यथा कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यामध्ये एकही कोरोना पॉझिटिव्ह नाही. केंद्रीय गृह विभागाने काही सूचना दिल्यामुळे लॉकडाऊनमध्ये शिथिलता आली असे समजायचे कारण नाही. राज्य शासनाकडून अधिकृत आदेश आल्याशिवाय व ज्यांना लिखित परवानगी दिली नाही अशा कोणत्यांनी दुकानदारांनी पुढील आदेशापर्यंत दुकाने उघडू नये. जिल्ह्यातील लॉकडाऊन ३ मेपर्यंत कायम आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी दिली.चंद्रपूर जिल्ह्यात अद्याप एकही पॉझिटिव्ह रूग्ण नाही. मात्र, नागपूर व यवतमाळ जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रूग्णांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे दोन्ही जिल्ह्याच्या सीमा सील करण्यात आल्या. कोणीही प्रवेश केल्यास १४ दिवस क्वारंन्टाईन केले जात आहे. त्यामुळे यातल्या प्रत्येक नागरिकांनी प्रशासनासोबत डोळ्यात तेल घालून यामध्ये एकही चूक होणार नाही, याची दक्षता घ्यावी. गावामध्ये अचानक साथ उद्भवल्यास काय करायचे, कशा पद्धतीने व्यवस्था करायची, यासाठी शनिवारी शहरातील तीन प्रभाग व जिल्ह्याच्या विविध भागात मॉकड्रिल अर्थात रंगीत तालीम करण्यात आली. यामुळे शहरातील अनेक भाग सील करण्यात आले होते. मात्र शहरात रुग्णांची वाढ झाल्याची अफवा काहींनी पसरवली असून अशा व्यक्तींवर कारवाई करण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी स्पष्ट केले.धान्यकिट वाटपचे अधिकार मनपाकडेशासनामार्फत निराश्रित, निराधार लोकांना जेवण पुरविल्या जाते. शिवभोजन योजना सुरू आहे. सोबतच आता केशरी शिधाकार्डधारकांना अन्नधान्य पुरविल्या जात आहे. मात्र, तयार अन्न किंवा अन्नधान्याची किट वाटप करण्याचे अधिकार फक्त महानगर पालिकेला शहरात दिले. अन्य ठिकाणी राज्य शासनाचे कर्मचारी याबाबत काम करीत आहे. त्यामुळे कोणत्याही स्वयंसेवी संस्थेने यासाठी गोंधळ घालू नये. शहरात संचारबंदी सुरू आहे. संचारबंदीचे नियम तोडल्यास गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला आहे.८ नमुन्यांच्या अहवालाची प्रतीक्षा२५ एप्रिल रोजी कोरोना संशयित म्हणून ९६ नागरिकांची नोंद झाली. यातील ८८ स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविले. त्यापैकी ८० नमुने निगेटिव्ह तर ८ नमुन्यांचा अहवाल अप्राप्त आहे. आतापर्यंत ३२ हजार १३ नागरिक विदेशातून, राज्याबाहेरून व जिल्हा बाहेरून आले. यापैकी २ हजार ५३५ नागरिक निगराणीखाली आहेत. २९ हजार ४७९ नागरिकांनी होम क्वारंन्टाईन पूर्ण केले. १०६ नागरिक संस्थात्मक विलगीकरणात आहेत, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राजकुमार गहलोत दिली.१३ लाखांचा दंड वसूलकोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू केलेल्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या २३६ प्रकरणात एकूण १३ लाख ५ हजार ७७० रूपयांचा दंड वसूल करण्यात आला तर ५८ नागरिकांना अटक झाली. शनिवारपर्यंत ७४१ वाहने जप्त करण्यात आली आहेत. जिल्ह्यात या काळातील विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांमध्ये गर्दी होणार नाही याची काळजी घेण्याचेही त्यांनी सांगितले. कोरोना आजार संपर्कातून येतो त्यामुळे शारीरिक दूरी ठेवणे अनिवार्य आहे. त्यादृष्टीने सण उत्सव साजरे करताना लक्ष ठेवावे. ३ मेपर्यंत लॉकडाऊन पर्यंत सहकार्य करण्याचे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याcollectorजिल्हाधिकारी