शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन हजारांवर काॅटेज, हाॅटेलमध्ये ‘सर्च ऑपरेशन’; संशयास्पद ‘बोटी’च्या संदेशानंतर पोलिस ‘अलर्ट’
2
पुढील काही महिने पृथ्वी वेगाने फिरणार; भविष्यात घड्याळाची वेळ बदलावी लागणार, ९ जुलैला काय घडलं?
3
रात्री ज्याला चोर म्हणून तुडवला, त्यालाच सकाळी जावई बनवला! रात्रभरात असं नेमकं घडलं काय? 
4
आजचे राशीभविष्य: या राशींसाठी लग्न जुळण्याचा योग, व्यापार - व्यवसायात फायदा होणार, चांगला दिवस
5
समलैंगिक संबंध, ब्लॅकमेलिंग अन् शेवट...; मुंबईतील ३ घटना, ३ मृत्यू, नेमकं काय घडले?
6
५० लाख नागरिकांना मिळणार जागेची मालकी; तुकडेबंदी कायदा तूर्त शिथिल, नंतर रद्द करणार
7
...तर खराब रस्त्यांसाठी नागरिकांनी या आमदारांना का मारू नये?; टॉवेल बनियनवर गावगुंडासारखा राडा
8
विद्यार्थिनींची अंतर्वस्त्रे उतरवली, कारण...; शहापूरच्या खासगी शाळेतील अत्यंत घृणास्पद प्रकार
9
सोळावं वरीस धोक्याचं... किशोरवयातच प्रौढपण; खेळण्याच्या वयात मुली पडतायेत वासनेचा बळी
10
मतदारांच्या कमाल संख्येनुसार मतदान केंद्रे; निवडणूक आयोगाचे निर्देश, एका इमारतीत आता १० केंद्रे
11
पंढरीचे ‘एआय’ वारकरी! AI ने केली २७ लाख लोकांची गर्दी मोजण्याची किमया
12
निवडणूक आयोग जनतेला मूर्ख समजतो की काय?; रोखठोक प्रश्न विचारणं आवश्यक बनलंय
13
महासंचालकांचे परिपत्रक सर्व पोलिसांवर बंधनकारक नाही का?; अपूर्ण केस डायरीवरून उच्च न्यायालय संतापले
14
मृत घोषित केलेले बाळ अंत्यसंस्कारावेळी रडले; अंबाजोगाईच्या रुग्णालयात धक्कादायक प्रकार
15
‘आई’ व्हा! शाळकरी मुलींनाही 'या' देशानं दिलं आमिष; मुलं जन्माला घातली तर मिळणार १ लाख
16
ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...
17
शाळेत शिकणारी मुलगी प्रेगनंट राहिल्यास १ लाख रुपये मिळणार; रशियाच्या या योजनेची होतेय चर्चा
18
मीरारोडचे पोलीस आयुक्त मधुकर पांडेंची बदली; मराठी मोर्चाला परवानगी नाकारल्याने मुख्यमंत्रीही वैतागले
19
पुन्हा रॉकेट बनला MRF चा शेअर, गेला ₹ 150000 पार; लोकांना केलं मालामाल! दिला बंपर परतावा
20
“महाराष्ट्रातील मतचोरीचा पॅटर्न बिहारमध्ये वापरायचा भाजपा, निवडणूक आयोगाचा प्रयत्न”: सपकाळ

गाळपेरास परवानगी नाकारावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2019 21:28 IST

माळढोक आणि सारस या पक्षांचे अधिवास संवर्धनासाठी शासनस्तरावरून प्रयत्न व्हावेत, यापुढे पक्षी अधिवास बाधक प्रकल्पावर बंदी घाला व गाळपेर करण्यास शासनाने परवानगी देऊ नये, असा एकमुखी ठराव १९ व्या विदर्भ पक्षीमित्र संमेलनात पारित करण्यात आला.

ठळक मुद्देविदर्भ पक्षी मित्र संमेलनात ठराव : मान्यवरांच्या उपस्थितीत सांगता

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : माळढोक आणि सारस या पक्षांचे अधिवास संवर्धनासाठी शासनस्तरावरून प्रयत्न व्हावेत, यापुढे पक्षी अधिवास बाधक प्रकल्पावर बंदी घाला व गाळपेर करण्यास शासनाने परवानगी देऊ नये, असा एकमुखी ठराव १९ व्या विदर्भ पक्षीमित्र संमेलनात पारित करण्यात आला.चंद्रपूर येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कर्मवीर कन्नमवार सभागृहात १९ वे विदर्भ पक्षीमित्र संमेलन चंद्रपूरच्या इको प्रो संस्थेच्या यजमानपदाखाली पार पडले. समारोपीय कार्यक्रमाला अध्यक्षस्थानी महाराष्ट्र पक्षीमित्र संघटनेचे अध्यक्ष डॉ. जयंत वडतकर तर प्रमुख पाहुणे म्हणून निवृत्त मुख्य संरक्षक संजय ठाकरे, ताडोबा कोअरचे उपसंचालक नानासाहेब लडकत, ग्रीन प्लॅनेट सोसायटीचे योगेश दूधपचारे, सार्डचे प्रकाश कामडे, इको प्रोचे पक्षी विभाग प्रमुख बंडू दुधे यांची उपस्थिती होती.संमेलनाध्यक्ष दिलीप वीरखडे यांच्या प्रमुख उपस्थितीत दोन ठराव पारित करण्यात आले. माळढोक आणि सारस या पक्षांच्या अधिवासात बाधक ठरणारे प्रकल्प घेण्यात येऊ नयेत, तलाव आणि धरणातील पाणी जसे ओसरले जाते, तसतसे त्या जागेत शेती केली जाते. हा अधिवास पक्षी व प्राण्यांसाठी अतिशय महत्वाचा असल्यामुळे गाळपेर करण्यास शासनाने परवानगी देऊ नये, असेही ठरावात म्हटले आहे.पहिल्या दिवशी दोन सत्र पार पडलीत. पहिल्या सत्रात चंद्रपूर जिल्ह्यातील ‘पक्षी अधिवास व संवर्धन’ या विषयावर मंथन झाले. सत्राच्या अध्यक्षस्थानी निवृत्त वनाधिकारी संजय ठाकरे होते. यासत्रात सार्डचे प्रकाश कामडे यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील पक्षी जगताचा व त्यांना असलेले धोक्याचा आढावा सादर केला. दुसऱ्या सत्रात विदर्भातील माळराने, पक्षी संरक्षण व संवर्धन यावर भंडारा येथील ज्येष्ठ पक्षी मित्र राजकुमार जोब यांच्या अध्यक्षतेखाली चर्चा झाली. वाशीम येथील अभ्यासक मिलिंद सावदेकर यांनी झिटिंग सिस्टीकोला या पक्ष्याच्या विणीचा अभ्यास शास्त्रशुध्द्ध पद्धतीने मांडला. चर्चेत अनेकजण सहभागी झाले होते.