शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

उद्योगांनी केले जीवनदायिन्यांचे वाटोळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2020 06:00 IST

चंद्रपूर जिल्ह्यात वनसंपदेसोबतच खनिज संपदाही विपूल आहे. त्यामुळे उद्योजकांनी चंद्रपूर जिल्ह्याकडे आपला मोर्चा वळविला आहे. मात्र वनसंपदेकडे दुर्लक्ष करीत केवळ खनिज संपदेकडे सर्वांनी लक्ष केंद्रित केले. त्यामुळे जंगलाचा झपाट्याने ऱ्हास झाला. आतातर उद्योगांनी जलस्रोतांनाही बाधित करणे सुरू केले आहे. जिल्ह्यात लहानमोठे असे एकूण ७८८ उद्योग आहेत.

ठळक मुद्देजिल्ह्याचे आरोग्य धोक्यात: वायू प्रदूषणाहून जलप्रदूषण गंभीर

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात औद्योगिक क्रांती झाली, हे खरे आहे; मात्र चंद्रपूरला औद्योगिक हब करण्याचा हा अट्टाहास जंगले भुईसपाट व जीवनदायिन्यांना ग्रहण लावत आहे. झरपट, इरई व वर्धा या नद्यांचे डोळ्यादेखत वाटोळे केले जात आहे. वाहत्या नद्यांचे पाणी निर्मळ, स्वच्छ अन् पवित्र असते, हा प्रमादच येथील मुर्दाड मानसिकतेने बिघडवून टाकला आहे. वाढत्या जलप्रदूषणाकडे आजच गांभीर्याने बघितले नाही तर पुढे या जीवनदायिन्यांनाच जिवंत ठेवणे अवघड होणार आहे.चंद्रपूर जिल्ह्यात वनसंपदेसोबतच खनिज संपदाही विपूल आहे. त्यामुळे उद्योजकांनी चंद्रपूर जिल्ह्याकडे आपला मोर्चा वळविला आहे. मात्र वनसंपदेकडे दुर्लक्ष करीत केवळ खनिज संपदेकडे सर्वांनी लक्ष केंद्रित केले. त्यामुळे जंगलाचा झपाट्याने ऱ्हास झाला. आतातर उद्योगांनी जलस्रोतांनाही बाधित करणे सुरू केले आहे. जिल्ह्यात लहानमोठे असे एकूण ७८८ उद्योग आहेत. प्रदूषण नियंत्रण मंडळाने केलेल्या सर्वेक्षणातून तब्बल ३७८ उद्योग नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम करतील, इतपत प्रदूषित असल्याचे स्पष्ट झाले आहे. यातील २१५ उद्योग मध्यम प्रदूषणकारी तर १६३ उद्योग अतिप्रदूषणकारी (रेड लेव्हल) आहेत. उद्योगांमधील प्रदूषणाची एवढी भयंकर स्थिती असतानाही यावर कुठलेच उपाय शोधण्यात आले नाही. त्यामुळे हे वायू प्रदूषण चंद्रपूरला देशपातळीवर घेऊन गेले. आता जलप्रदूषणातही जिल्हा कूप्रसिध्द होत आहे. वायू प्रदूषण तर थांबले नाही, मात्र जलप्रदूषणालातरी आताच थांबविणे गरजेचे झाले आहे. अन्यथा जिल्ह्यात आरोग्याची अशी समस्या निर्माण होईल, जी शासनालाही सोडविता येणार नाही.वर्धा, इरई नदीत सोडले जाते रसायनमिश्रित पाणीवरोरा तालुक्यातील वर्धा पॉवर, जीएमआरसारख्या उद्योगांचे रसायनमिश्रित पाणी दैवल नाल्यात सोडले जाते. पुढे हे पाणी वर्धा नदीला मिळते. कर्नाटका एम्टाचे दूषित पाणी कोंढा नाल्याद्वारे वर्धा नदीतच येते. कोरपना तालुक्यातील अल्ट्राटेक, मुरली अ‍ॅग्रो सिमेंट कंपन्या वर्धा नदीलाच प्रदूषित करीत आहेत. बल्लारपूर पेपरमीलही दोन ठिकाणाहून वर्धा नदीला प्रदूषित करीत आहे. वास्तविक हे सर्वच उद्योग वर्धा नदीवरच तग धरून आहेत. याच नदीचे पाणी वापरून उद्योग आपली चाके फिरवित असले तरी तिच्या स्वच्छतेविषयी त्यांनी कधीच सोयरसुतक दाखविले नाही. उद्योगातील रसायनमिश्रित पाणी सोडताना त्यावर प्रक्रिया करणे गरजेचे आहे. मात्र कोणताच उद्योग या फंदात पडत नाही. प्रदूषण नियंत्रण मंडळाचा तर केव्हाचाच धृतराष्ट्र झाला असल्याने त्यांना ही बाब कधी दिसू शकली नाही. दुसरीकडे चंद्रपूरची जीवनदायिनी असलेल्या इरईचा वेकोलिने धिंगाना केला आहे. या नदीला वेकोलिने प्रदूषित तर केलेच; सोबत ओव्हरबर्डन टाकून तिचे नैसर्गिक पात्रच बदलवून टाकले आहे. चंद्रपुरातील ऐतिहासिक झरपट नदीचे स्थानिक जिल्हा व नगर प्रशासनानेच अस्तित्व संपविले आहे. या नदीचा सांडपाणी वाहून नेणारा नाला करण्याइतपत उदासीनता प्रशासनाने आजही कायम ठेवली आहे.नद्या स्वच्छतेबाबत प्रशासन उदासीनचंद्रपूर जिल्ह्यात वर्धा, पैनगंगा, शिरणा, उमा, झरपट, इरई यासारख्या नद्या वाहतात. पाण्याचे आणि पर्यायाने नद्यांचे महत्त्व सर्वांना ठाऊक आहे. सध्या या नद्या विविध कारणांमुळे प्रदूषित होत आहेत. मात्र जिल्हा प्रशासन या नद्यांविषयी गंभीर असल्याचे दिसत नाही. जिल्ह्यातील या नद्या स्वच्छतेसाठी एखादी मोहीम जिल्हा प्रशासनाने हाती घेण्याची गरज आहे.

टॅग्स :riverनदी