शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या TVK पक्षाचा 'ब्लॉकबस्टर शो'; DMK ला जोरदार धक्का
2
West Bengal Election Result 2026: पश्चिम बंगालमध्ये बहुमतासाठी किती हवा आकडा?; भाजपा इतिहास घडवण्याच्या तयारीत
3
तामिळनाडूत प्रस्थापितांना धक्का? अभिनेते विजय यांच्या टीव्हीकेची जोरदार मुसंडी, सुरुवातीलाच एवढ्या जागांवर मिळवली आघाडी
4
West Bengal Assembly Election 2026: प. बंगालमध्ये सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपानं गाठली शंभरी; TMC सोबत अटीतटीची लढत
5
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; सेन्सेक्स ३४४ तर निफ्टीमध्ये ६६ अंकांची वाढ; 'हे' शेअर्स सुस्साट
6
'राजा शिवाजी'मध्ये शिवरायांच्या सासूच्या भूमिकेत दिसली 'ही' अभिनेत्री, पोस्ट शेअर करत म्हणाली...
7
Election Results 2026: केरळमध्ये काँग्रेस सुसाट, भाजपाचीही सात जागांवर आघाडी
8
अंगारक संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, WhatsApp Status शेअर करून बाप्पाचे आशीर्वाद सर्वांपर्यंत पोहोचवा
9
West Bengal Assembly Election: पश्चिम बंगालमध्ये निकालाच्या आदल्या रात्री काळेबेरे? ममता बॅनर्जींच्या ‘त्या’ पोस्टनं खळबळ!
10
Baramati Rahuri Results 2026: बारामतीत अपेक्षेप्रमाणे सुनेत्रा पवार यांना आघाडी, तर राहुरीचा कल काय? आहे अशी अपडेट
11
बंगालमध्ये तृणमूल-भाजपामध्ये अटीतटीची लढत, सुरुवातीच्या कलांमध्ये कुणाला आघाडी? अशी आहे आकडेवारी
12
Tamil Nadu Elections 2026: विजय थलपती ते खुशबू सुंदर... पडद्यावरच्या कलाकारांची प्रतिष्ठा पणाला, कोण मारणार बाजी?
13
भाजपासाठी पश्चिम बंगाल ठरणार 'लास्ट फ्रंटियर'; जय-पराजयाचा परिणाम 'मिशन UP' वर पडणार?
14
Post Office ची कमाई करुन देणारी स्कीम, जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹४४,९९५ चं फिक्स व्याज; मिळतेय सरकारची 'गॅरेंटी'
15
राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार?
16
'राजा शिवाजी'चं वीकेंड कलेक्शन किती? समोर आले आकडे; मराठी प्रेक्षकांची मान उंचावली
17
पश्चिम बंगालमधील या दोन मतदारसंघात 'कांटे की टक्कर', निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष
18
आजचे राशीभविष्य, ०४ मे २०२६: मिथुन, वृश्चिक, मकर राशींना धनलाभाचे संकेत; कसा असेल तुमचा दिवस?
19
पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा
20
पाऊस चोरणारे देश? अमेरिका-इस्रायलवर 'ढगचोरी'चा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षणावरून सत्ताधारी व विरोधकात जुंपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 00:39 IST

जिल्हा परिषदेच्या केवळ शिक्षण विभागातील विविध प्रश्नांवर मंगळवारी जिल्हा परिषदेची विशेष सभा पार पडली.

जिल्हा परिषदेची सभा : अनेक प्रश्नांवर मोघम उत्तरे दिल्याचा विरोधकांचा आरोपचंद्रपूर : जिल्हा परिषदेच्या केवळ शिक्षण विभागातील विविध प्रश्नांवर मंगळवारी जिल्हा परिषदेची विशेष सभा पार पडली. या सभेत शिक्षण विभागाशी निगडीत अनेक प्रश्नांवर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांची कोंडी झाली. सत्ताधारी मोघम, चुकीचे उत्तरे देऊन विषय पुढे ढकलण्याचा प्रयत्न करीत होते. अधिकारीही सदस्यांची दिशाभूल करून चुकीची माहिती सादर करीत होते, असा आरोप विरोधक करीत होते. त्यामुळे सभेत चांगलाच गोंधळ उडाला. सत्ताधारी गटाच्या एका महिला सदस्याने ‘अधिकाऱ्यांवर तुमचा वचक नाही’ असे पदाधिकाऱ्यांनाच सुनावल्याने वातावरण आणखीणच तापले.जिल्हा परिषदेतील काँग्रेसचे गटनेते डॉ. सतीश वारजूकर यांनी मागील अनेक दिवसांपासून शिक्षण क्षेत्रातील विविध प्रश्नांवर चर्चा घडवून आणण्यासाठी विशेष सभा बोलाविण्याची मागणी केली होती. त्यांच्या मागणीनुसार केवळ शिक्षण विभागाच्या प्रश्नांवर मंगळवारी सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेत सदस्यांना दिलेल्या इतिवृत्तातील माहिती आणि प्रत्यक्षात असलेली वस्तुस्थिती यात मोठी तफावत होती. ही बाब विरोधी सदस्यांच्या निदर्शनास येताच सदस्यांनी आक्षेप नोंदविला. जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या १ हजार ५८५ शाळा असून, यापैकी १ हजार ९६ शाळांना क्रीडा साहित्य पुरविण्यात आल्याचे सांगण्यात आले. परंतु, क्रीडा विभागाकडून पुरविण्यात आलेल्या साहित्याबाबत प्रशासनाकडे कोणतीही नोंद नसल्याचे आढळून आले. तर ८५८ शाळांमध्ये क्रीडांगण आहेत, तर ७२७ शाळा क्रीडांगणाविना असल्याचे स्पष्ट झाले. मात्र, असे असतानाही या शाळांना क्रीडा साहित्य पुरविण्यात आले आहे. याची माहितीच शिक्षण विभागाला नसल्याचे सभेत स्पष्ट झाले. याबाबत शिक्षणाधिकाऱ्यांनीही चूक मान्य केली, जिल्ह्यातील १ हजार ५८५ शाळांपैकी केवळ २६ शाळांमध्येच शौचालय नसल्याचे इतिवृत्तात दाखविण्यात आले होते. त्यामुळे जर जंगलालगतच्या शाळांपैकीच ४२ शाळा शौचालयाविना असताना एकूण शाळांपैकी केवळ २६ शाळाच या सुविधेपासून वंचित कशा, असा प्रश्न विरोधकांनी उपस्थित करून आकडेवारी चुकीची असल्याचे पदाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले. जिल्ह्यात २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या ३१२ शाळा दाखविण्यात आले आहे. मात्र, त्याची यादी देण्यात आली नाही. संरक्षक भींतीबाबतही चुकीची माहिती देण्यात आली. वरिष्ठ वेतनश्रेणीचेही ७३७ प्रकरणे मागील दोन वर्षांपासून प्रलंबित असून यावर काय कार्यवाही केल्याचा प्रश्न उपस्थित केला. मात्र, समाधानकारक उत्तर मिळाले नाही, असा आरोप डॉ. वारजूकर यांनी केला.‘लोकमत’च्या वृत्तावर सभागृहात चर्चा‘खिशात पास तरीही, विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास’ असे वृत्त व ‘विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला’ या विषयावर सोमवारी ‘लोकमत’ने विशेष पान काढले होते. याबाबत जिल्हा परिषद काँग्रेसचे उपगटनेता खेमराज म्हरस्कोल्हे यांनी सभागृहात ‘लोकमत’ वृत्तपत्र उंचावून प्रश्न उपस्थित केला. तेव्हा अध्यक्षांनी एसटी आगाराच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी पुढाकार घेण्याचे आश्वासन दिले. सत्ताधारी गटाच्या महिला सदस्याकडून घरचा अहेरशिक्षण विभागातील ज्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी विशेष सभेचे आयोजन केले होते, त्या एकाही प्रश्नाची माहिती अचूक देण्यात सत्ताधारी अपयशी ठरले. त्यामुळे विरोधकांसह सत्ताधारी गटाच्या सदस्यांनीही नाराजी व्यक्त केली. पंचायत समिती स्तरावर अधिकारी जुमानत नसल्याचा आरोप करीत सावली तालुक्यातील भाजपच्या एका महिला जि.प. सदस्याने पदाधिकाऱ्यांना ‘अधिकाऱ्यांवर तुम्हचा वचक नाही’ असे खडेबोल सुनावले. त्यामुळे वातावरण तापले होते.