शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा निर्धार

By admin | Updated: June 21, 2017 00:43 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्र सरकारने २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पादन व उत्पन्न दुप्पट करण्याचा निर्धार केला आहे.

सुधीर मुनगंटीवार : चंद्रपूर, गडचिरोली व नंदूरबार जिल्ह्यातील नागरिकांना गॅस देणारचंद्रपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्र सरकारने २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पादन व उत्पन्न दुप्पट करण्याचा निर्धार केला आहे. त्यांच्या निर्णयाप्रमाणे सन २०२२ पर्यंत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे सुध्दा उत्पादन व उत्पन्न दुप्पट करण्याचा निर्धार महाराष्ट्र सरकारने घेतला असल्याचे वित्त, नियोजन व वनेमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. केंद्र शासनाच्या उज्वला गॅस योजनेमधून आतापर्यंत देशातील दोन कोटी गरीब, किसान व मजूर नागरिकांना १०० टक्के सुटीवर गॅसचे वितरण करण्यात आल्याचे ना. सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. याच योजनेमधून महाराष्ट्रातील चंद्रपूर, गडचिरोली व नंदूरबार जिल्ह्यातील सर्व समाजाच्या नागरिकांनाही गॅस देण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याचेही ना. मुनगंटीवार म्हणाले.केंद्र शासनाच्या तीनवर्षे पूर्तीनिमित्त बल्लारपूर येथे वेस्टर्न कोल फिल्ड लि.च्या वतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, आमदार अ‍ॅड. संजय धोटे, नगराध्यक्ष हरीष शर्मा, उपाध्यक्ष मीना चौधरी, पोंभूर्णा नगरपंचायत अध्यक्ष गजानन गोरंटीवार, पंचायत समिती सभापती अल्लका आत्राम, वेकोलिचे क्षेत्रीय महाप्रबंधक आभासिंग व खुशाल बोंडे उपस्थित होते. केंद्र शासनाने सर्वांचा विकास साधण्यासाठी तीन वर्षात विविध योजना मंजूर केल्या असून त्या योजनाच्या माध्यमातून सर्वांना न्याय मिळाला पाहिजे, असे पंतप्रधान मोदी यांचे धोरण असल्यानेच अशा प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन करुन त्यांना न्याय देण्याचा संकल्प करीत असल्याचे ना. मुनगंटीवार यांनी सांगितले. ना. हंसराज अहीर म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातील सर्व भागात व सर्व क्षेत्रात लक्ष ठेवून असून त्यांनी संपूर्ण देशाचा विकास साधण्याचा निर्धार केला आहे. त्या दृष्टीने त्यांनी प्रधानमंत्री आवास योजना, स्कील इंडिया, सिंचन योजना, अमृत योजना, देशाची उत्पादकता वाढविण्यासाठी मेक इन इंडिया इत्यादी प्रकारच्या अनेक विविध लोकाभिमुख योजनांची अंमलबजावणी सुरु केली आहे. कार्यक्रमाच्या शेवटी आनंदवन येथील दिव्यांग कलाकारांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध करणारी गीते व नृत्याचे प्रदर्शन केले. यावेळी उज्वला गॅस योजनेतून गॅस कनेक्शनचे वितरणही करण्यात आले. तसेच ज्या नागरिकांनी गॅसची सबसिडी सोडली अशा व्यक्तींचाही सत्कार करण्यात आला.