कंत्राटी कामगारांचे डेरा आंदोलन सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:29 IST2021-02-10T04:29:11+5:302021-02-10T04:29:11+5:30

सहायक कामगार आयुक्तांनी घेतली बैठक चंद्रपूर : सात महिन्याचे थकीत वेतन व दोन वर्षांपूर्वी शासनाने मंजूर केलेले किमान वेतन ...

Dera agitation of contract workers continues | कंत्राटी कामगारांचे डेरा आंदोलन सुरूच

कंत्राटी कामगारांचे डेरा आंदोलन सुरूच

सहायक कामगार आयुक्तांनी घेतली बैठक

चंद्रपूर : सात महिन्याचे थकीत वेतन व दोन वर्षांपूर्वी शासनाने मंजूर केलेले किमान वेतन लागू करावे, या मागणीसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील ५०० कंत्राटी कामगारांनी मंगळवारी दुसऱ्या दिवशीही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरूच ठेवले.

दरम्यान, दुपारी १ वाजता सहाय्यक कामगार आयुक्त नितीन पाटणकर यांनी आपल्या कक्षामध्ये तातडीची बैठक बोलावली. यावेळी जन विकास कामगार संघाचे अध्यक्ष पप्पू वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रतिनिधी डॉ. राजेंद्र सुरपाम व प्रशासकीय अधिकारी संजीव राठोड, सतीश येसांबरे, अमोल घोडमारे, कांचन चिंचेकर, ज्योती कांबळे, सुनीता रामटेके, शेवंता भालेराव, भाग्यश्री मुधोळकर, सीमा वासमवार, माया वांढरे,अमिता वानखेडे, सुमित्रा थोरात, सपना बांबोळे, रिना नाकाडे, गीता मून, भारती पचारे, अरुणा पुन्नावार, अश्विनी नोमूलवार उपस्थित होते. दोन वर्षांपूर्वी किमान वेतनाच्या दरानुसार निविदा प्रक्रिया काढण्यासाठी निधी मंजूर केली. परंतु वैद्यकीय महाविद्यालयाच्या कारभारामुळे ५०० कामगार वंचित आहेत. सात महिन्यांचे थकीत वेतनही मिळाले नाही. डॉ. सुरपाम व प्रशासकीय अधिकारी राठोड यांनी थकीत वेतन व किमान वेतनाबाबत शासनस्तरावर कार्यवाही सुरू असल्यामुळे निश्चित तारीख देता येणार नाही, असे उत्तर दिले. त्यामुळे आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार कामगारांनी व्यक्त केला आहे.

Web Title: Dera agitation of contract workers continues