शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
2
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
3
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
4
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
5
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
6
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
7
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
8
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
9
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
10
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
11
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
12
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
13
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
14
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
15
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
16
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
17
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
18
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
19
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
20
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
Daily Top 2Weekly Top 5

घरेलू कामगार मोलकरणींची पेंशनसाठी सरकारविरुद्ध निदर्शने

By admin | Updated: December 21, 2015 01:06 IST

पेन्शन लागू करण्यात यावे, या मागणीसाठी घरेलू महिला कामगारांनी गुरूवारी येथे निदर्शने केली.

ब्रह्मपुरीत आंदोलन : कामगार महिलांचा उत्स्फूर्त सहभागब्रह्मपुरी : पेन्शन लागू करण्यात यावे, या मागणीसाठी घरेलू महिला कामगारांनी गुरूवारी येथे निदर्शने केली. घरेलू कामगार मोलकरीण महिला अगदी सकाळपासून ते रात्रीपर्यंत अगदी अत्यल्प रोजीमध्ये अनेकांच्या घरची भांडी, कपडे धुवून आपल्या कुटूंबाचा उदरनिर्वाह करतात. परंतु या अत्यल्प मिळणाऱ्या मानधनात संपूर्ण कुटूंब चालविणे या महिला मोलकरिण महिलेला तारेवरची कसरत करावी लागत आहे. म्हणून आयटक संघटनेच्या नेतृत्वात महाराष्ट्रामध्ये २००४ पासून मोलकरणीच्या विविध मागण्यांना घेऊन सतत आंदोलने, मोर्चे, घेराव घालून, संघर्ष करून सरकारला शेवटी २०११ मध्ये घरेलू कामगार मोलकरीण कल्याणकारी मंडळाची निर्मिती करण्यास भाग पाडले. तेव्हापासून नोंदणीकृत मोलकरीणला विविध योजनांचा लाभ मिळू लागला, परंतु हल्ली वाढत्या महागाईनुसार सरकारने काही नवीन योजना घोषित करून मोलकरणी महिलांना द्यायला पाहिजे. परंतु सरकार याकडे नेहमी दुर्लक्ष करीत आहे. म्हणून प्रलंबीत मागण्यांना घेऊन आयटक संलग्न घरेलू कामगार मोलकरीण संघटनेच्या वतीने ब्रह्मपुरी येथील हुतात्मा स्मारकासमोर मोलकरिण महिलांना वयाच्या ६० वर्षानंतर किमान तीन हजार रुपये पेंशनचा कायदा करावा. या मागणीला घेऊन सरकारविरुद्ध निदर्शने केली.स्थानिक हुतात्मा स्मारक येथे १७ डिसेंबर २०१५ ला आयटक संघनेच्या वतीने घरेलू कामगार मोलकरीन महिलांचा तालुकास्तरीय मेळावा तालुकाध्यक्ष कुंदा कोहपरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून संघटनेचे जिल्हाध्यक्ष विनोद झोडगे, पुरुषोत्तम ढोरे, दुर्गा नान्हे, मिरा ढोरे, शशिकला वासनिक आदी उपस्थित होत्या. यामध्ये विनोद झोडगे यांनी नोंदणीकृत घरेलू कामगार मोलकरीन महिलांना विविध योजनांची माहिती दिली. यामध्ये वयाची ५५ वर्षे पूर्ण झालेल्या मोलकरीणला दहा हजार रुपये सन्मानधन दिले जाते. मोलकरीणच्या वारसाला मोलकरीणच्या मृत्यूनंतर तीस हजार रुपये व दोन हजार रुपये अंत्यविधीला दिला जातो. मोलकरीणचा अपघाती मृत्यू झाल्यास ३७ हजार ५०० रुपये दिल्या जातो व कायमचे अपंगत्व आल्यास पाच हजार रुपये दोन अपत्यासाठी दिला जातो. (शहर प्रतिनिधी)