शहरं
Join us  
Trending Stories
1
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
2
जगातील ११ रिफायनरीमध्ये गुप्त हल्ले, भारतासह US मध्ये हाहाकार; मोदींचा दौरा टळला, योगायोग की कट?
3
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
4
"तो माझ्या छातीकडे टक लावून पाहायचा..."; नाशिक TCS प्रकरणात महिला टीम लीडरला आला विचित्र अनुभव
5
BMC: स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करा; महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश  
6
"२०२९ विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते", रोहित पवारांचे मत
7
Top Marathi News LIVE Updates: बारामतीत ११ वाजेपर्यंत २०.५९ टक्के तर राहुरीमध्ये १८.२२ टक्के मतदान
8
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
9
करणीबाधेची भीती दाखवून महिलेवर अत्याचार; भोंदू बाबा महेशगिरीवर लासलगाव पोलिसांत अखेर गुन्हा दाखल!
10
Mumbai Mithi River: ‘मिठी’ नदीच्या सफाईचा अहवाल द्या! स्थायी समिती अध्यक्षांच्या प्रशासनाला सूचना 
11
दमदार फॉर्म, कुशल कप्तानी, तरीही हैदराबाद ईशान किशनला कर्णधारपदावरून हटवणार, कारण काय?   
12
अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य; प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक
13
१४ चौकार, ५ षटकार... लॉरा वूल्फार्टचा शतकी धमाका; स्मृती मानधानाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
14
Mumbai: 'हाजी नुराणी चाळवासीयांनो, उद्यापर्यंत घरे रिकामी करा! नाही तर...' एमएमआरडीएचा इशारा 
15
अक्कलकोटच्या स्वामींचा लाडका शिष्य: योगिराज शंकर महाराज पुण्यतिथीनिमित्त विशेष लेख
16
रितेश देशमुखसोबत सीन ते परदेशातून आलेली ॲक्शन टीम; 'राजा शिवाजी'मध्ये भूमिका साकारताना रामचंद्र गावकर भारावला
17
Share Market: उघडताच जोरदार आपटला शेअर बाजार! Sensex ७०० अंकांनी खाली, 'या' शेअर्स मध्ये मोठी घसरण
18
Stray Dogs: भटक्या श्वानांच्या घरासाठी पालिकेला कोणी जागा देता का?
19
MBA नंतर २५ लाखांची नोकरी सोडून चालवू लागला ओला कार; ३ वर्षात ६.५० लाख कमाई, खरेच शक्य आहे?
20
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

विमुक्त भटक्या जमातीला घरकुल देण्याची मागणी

By admin | Updated: March 13, 2015 00:58 IST

तालुक्यात सध्याच्या परिस्थितीत शासन केवळ एससी, एसटी लाभार्थ्यांना घरकुल देत असून विमुक्त भटक्या जमातीतील लाभार्थी घरकुलापासून वंचित राहत आहेत.

चिमूर : तालुक्यात सध्याच्या परिस्थितीत शासन केवळ एससी, एसटी लाभार्थ्यांना घरकुल देत असून विमुक्त भटक्या जमातीतील लाभार्थी घरकुलापासून वंचित राहत आहेत. तालुक्यातील विमुक्त भटक्या जमातीतील लाभार्थ्यांनाही घरकुल देण्याची मागणी एकलव्य सेनेचे डॉ. दिलीप शिवरकर यांनी केली आहे.मागील दहा वर्षापासून घरकुल संदर्भात शासनाचे विमुक्त भटक्या जमातीसाठी कृती कार्यक्रम नाही. संपूर्ण जिल्ह्यात मच्छिमार संस्था असून त्या संस्थाना घरकुल देण्यात आले नाही. महाराष्ट्र शासनाने आरक्षनानुसार घरकुल प्रणाली सुरू करावी, जातवार लोकसंख्या निर्धारण करुन त्यानुसार दारिद्ररेषेखालील घरकुल देण्यात यावे, असे शिवरकर यांनी निवेदनात म्हटले आहे.स्वातंत्र्यकाळापासून आजपर्यंत विमुक्त भटक्या जमातीतील नागरिकांचे राहनीमान उंचावले नाही. आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने शेकडो बीपीएलधारक लाभार्थी घराचे बांधकाम करु शकत नाही. त्यामुळे या लाभार्थ्यांना घरकुलापासून वंचित रहावे लागत आहे. शासनाने चिमूर तालुक्यातील विमुक्त भटक्या जमातीतील लाभार्थ्यांना घरकुलासाठी अनुदान देण्याची मागणी डॉ. दिलीप शिवरकर, प्रकाश नान्हे, मिलिंद भनारे, रामदास हेमके, सह एकलव्य सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. विमुक्त भटक्या जमातीच्या समस्यांकडे शासनाचे सतत दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे या जमातीच्या नागरिकांना दारिद्र्याचे जीवन जगावे लागत आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी आहे. (तालुका प्रतिनिधी)