रिक्त पदे भरण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:31 IST2021-09-22T04:31:49+5:302021-09-22T04:31:49+5:30
ऑटोचालकांना अनुदान देण्याची मागणी चंद्रपूर : लॉकडाऊनमुळे ऑटोचालकांचे जगणे कठीण झाले आहे. जिल्ह्यात ७ हजार ऑटोरिक्षा चालक आहे. सद्यस्थितीत ...

रिक्त पदे भरण्याची मागणी
ऑटोचालकांना अनुदान देण्याची मागणी
चंद्रपूर : लॉकडाऊनमुळे ऑटोचालकांचे जगणे कठीण झाले आहे. जिल्ह्यात ७ हजार ऑटोरिक्षा चालक आहे. सद्यस्थितीत प्रवासीच नसल्याने व्यवसाय होत नाही. त्यामुळे जगायचे कसे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यामुळे शासनाने किमीन १० हजार रुपये मदत करावी, अशी मागणी ऑटोचालकांनी केली आहे.
बाजारात उसडतेय तोबा गर्दी
चंद्रपूर : शहरातील गोल बाजार, गांधी चौक, बंगाली कॅम्प, तुकूम, एसटी वर्कशाप, जटपुरा गेट परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी असते. गोल बाजार परिसरातील बाजारपेठ सायंकाळपर्यंत असते. सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत ही बाजारपेठ गजबजलेली असते. यामध्ये विक्रेत्यांसह ग्राहकही मोठ्या प्रमाणात येतात. बाजारात सोशल डिस्टन्सिंगचा अभाव दिसून येतो. तसेच अनेक जण मास्कसुद्धा वापरत नाही. परिणामी संसर्ग वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
शासकीय योजनांबाबत जनजागृती करावी
चंद्रपूर : शासनाकडून सामान्य नागरिकाच्या कल्याणासाठी अनेक योजना आहेत. मात्र या योजनांची माहितीच अनेकांपर्यंत पोहचली नसल्याने नागरिक योजनांपासून वंचित आहे. योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी मागणी आहे.
समस्या सोडविण्याची नागरिकांची मागणी
चंद्रपूर : जिवतील वर्षानुवर्षे रखडलेल्या मूलभूत समस्या तातडीने सोडविण्याची मागणी केली जात आहे. शहरातील समस्या अद्यापही कायम असून नागरिकांना गैरसोईचा सामना करावा लागत आहे. दुर्गम तालुका असल्यामुळे या तालुक्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
शेतीपूरक योजना गावात पोहोचवा
चंद्रपूर : जिल्ह्यातील बहुतांश नागरिक शेतीवरच अवलंबून आहे. मागील वर्षापासून कोरोना संकटामुळे आर्थिक समस्या निर्माण झाल्या आहेत. दरम्यान, अद्यापही शासनाच्या योजना गावात न आल्याने शेतकरी निराश आहेत. दुग्ध व शेतीपूरक अन्य योजना आणण्यासाठी लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करावा, अशी मागणी केली आहे.
गंजवार्ड परिसरातील रस्त्यावर दुर्गंधी
चंद्रपूर : येथील गंजवार्ड परिसरातील रामाळा तलावाशेजारी असलेल्या चौकामध्ये कचरा टाकत असल्याने रस्त्यावर दुर्गंधी पसरली आहे. महानगरपालिकेने याकडे विशेष लक्ष देऊन नियमित कचरा साफ करावा, अशी मागणी होत आहे. शहरात डेंग्यूचे रुग्ण वाढत आहे. त्यामुळे स्वच्छता गरजेची आहे.