शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
2
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
3
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
4
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
5
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
6
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
7
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
8
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
10
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
11
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
12
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
13
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
14
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
15
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
16
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
17
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
19
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
20
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
Daily Top 2Weekly Top 5

वनहक्क पट्टे देण्यास प्रशासनाकडून दिरंगाई

By admin | Updated: November 18, 2015 01:13 IST

न्यायालयाच्या आदेशानंतरही जबरानज्योत शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे पट्टे देण्यास प्रशासनाकडून टाळाटाळ सुरू आहे.

युवक बिरादरी संघटना : न्यायालयात याचिका दाखल करणारचंद्रपूर : न्यायालयाच्या आदेशानंतरही जबरानज्योत शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे पट्टे देण्यास प्रशासनाकडून टाळाटाळ सुरू आहे. याविरोधात मूल तालुका युवक बिरादरी संघटना न्यायालयात अवमान याचिका दाखल करणार असून तसे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देण्यात आले आहे.अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वननिवासी वनहक्क अधिनियम २००६ नियम २००८ कायद्यांतर्गत जिल्ह्यातील चंद्रपूर, मूल, पोंभूर्णा, सावली, सिंदेवाही, चिमूर, गोंडपिंपरी, ब्रह्मपुरी, नागभीड, बल्लारपूर, राजुरा आणि वरोरा तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांनी आपले अतिक्रमित शेतीच्या पट्यासाठी वैयक्तिक वनहक्काचे दावे युवक बिरादरी संघटनेमार्फत सादर केले. वनहक्क कायद्यातील २०१२ च्या सुधारित नियमानुसार ग्राम वनहक्क समितीकडे सादर झालेले दावे उपविभागीय अधिकारीस्तरीय समितीकडे सादर करण्यात आले. मात्र या समितीने दावे प्रलंबित ठेवले. याविरुद्ध वनहक्काचे दावे दाखल करणाऱ्या शेतकऱ्यांच्या वतीने युवक बिरादरी संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे तक्रारी केल्या. मात्र त्यावर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कोणतेही उत्तर मिळाले नाही. वनहक्क कायद्यानुसार वनहक्काच्या पट्टयांसाठी शेतकऱ्यांनी सामूहिक आणि वैयक्तिकरित्या दाखल केलेले दावे अनेक वर्षे प्रलंबित ठेवून नंतर ते गहाळ झाल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे युवक बिरादरी संघटनेने पुढाकार घेऊन शेतकऱ्यांचे दावे प्रशासनाकेडे सादर केले. मात्र प्रशासनाने त्यावर कोणताही निर्णय घेतला नाही. प्रशासनाच्या अशा सततच्या दप्तर दिरंगाईला कंटाळून युवक बिरादरी संघटनेने प्रशासनाविरुद्ध उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली. या याचिकेवर खंडपीठाने १० जून २०१५ ला निकाल दिला. वनहक्काच्या दाव्यावर तातडीने निर्णय घेण्याचे आदेश प्रशासनाला दिले. मात्र चार महिन्यांचा कालावधी लोटूनही प्रशासनाने याबाबत कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे अवमान याचिका दाखल करणार असल्याचे अध्यक्ष कवडू येनप्रेडीवार यांनी म्हटले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)