अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या नियुक्तीनंतरही रूजू होण्यास विलंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2020 05:00 AM2020-07-09T05:00:00+5:302020-07-09T05:00:48+5:30

चिमूर क्रांतीभूमीला जिल्हा घोषित करण्याची मागणी ३५ वर्षांपासून दुर्लक्षित होती. आमदार कीर्तीकुमार भांगडिया यांनी १६ आॅगस्ट २०१७ रोजी शहिद स्मृती दिन सोहळ्यात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र्र फडणवीस यांचे लक्ष वेधले होते. त्यामुळे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयासह उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय उभारण्याची घोषणा फडणवीस यांनी केलीे. उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय गतवर्षीच सुरू झाले.

Delay in implementation even after appointment of Upper Collector | अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या नियुक्तीनंतरही रूजू होण्यास विलंब

अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या नियुक्तीनंतरही रूजू होण्यास विलंब

Next
ठळक मुद्देकार्यालय निर्मितीवरच प्रश्नचिन्ह : उच्चस्तरीय समितीने दिली होती मंजुरी

लोकमत न्यूज नेटवर्क
चिमूर : तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र्र फडणवीस यांनी १६ आॅगस्ट २०१७ रोजी चिमूर येथे अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या निर्मितीची घोषणा केली होती. उच्चस्तरीय समितीने मंजुरी दिल्यानंतर मुख्य सचिव अजय मेहता यांच्या अध्यक्षतेखालील समितीने येथील अप्पर जिल्हाधिकारीसह सहा पदांना मान्यता दिली. अप्पर जिल्हाधिकारी म्हणून शशिकांत सुके यांची नियुक्तीही झाली. मात्र दोन महिने होवूनही रूजू झाले नाही.
त्यामुळे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या निर्मितीवरच प्रश्नचिन्ह लागले आहे.
चिमूर क्रांतीभूमीला जिल्हा घोषित करण्याची मागणी ३५ वर्षांपासून दुर्लक्षित होती. आमदार कीर्तीकुमार भांगडिया यांनी १६ आॅगस्ट २०१७ रोजी शहिद स्मृती दिन सोहळ्यात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र्र फडणवीस यांचे लक्ष वेधले होते. त्यामुळे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयासह उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय उभारण्याची घोषणा फडणवीस यांनी केलीे. उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय गतवर्षीच सुरू झाले.
अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाबाबत उच्चस्तरीय समितीने ८ जुलै २०१९ रोजी मंजुरी दिल्यानंतर मुख्य सचिव अजय मेहता यांच्या अध्यक्षतेखालील समितीने अप्पर जिल्हाधिकारी पदासह नायब तहसीलदार १, लघुलेखक १, अव्वल कारकून १, लिपिक टंकलेखक २ तसेच चालक, शिपाई अशी सहा पदे शिपाई बाह्यस्रोताद्वारे भरण्यास मान्यता देण्यात आली आहे.

नागरिकांची कामे रखडली
चिमुरचे पहिले अप्पर जिल्हाधिकारी म्हणून शशिकांत सुके यांची राज्य शासनाने ३० एप्रिल २०२० रोजी नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र दोन महिने होवूनही रूजू झाले नाहीत. त्यामुळे नागरिकांची विविध कामे रखडली आहेत. दरम्यान खासदार अशोक नेते यांनी आयुक्त (महसूल) नागपूर यांना पत्र लिहून चिमूर येथील अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयात अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना रूजू करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

Web Title: Delay in implementation even after appointment of Upper Collector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.