शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

बाबासाहेब आंबेडकर पुतळा सौंदर्यीकरणाची समिती घोषित करा

By admin | Updated: April 2, 2016 00:50 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १४ एप्रिल रोजी येणारी शतोकोत्तर रौप्य जयंती लक्षात घेता सौंदर्यीकरणाच्या कामाला गती देण्याकरिता ..

चंद्रपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १४ एप्रिल रोजी येणारी शतोकोत्तर रौप्य जयंती लक्षात घेता सौंदर्यीकरणाच्या कामाला गती देण्याकरिता आयुक्त यांच्या नेतृत्वामध्ये एक सर्व समावेशक समिती गठीत करण्यात यावी, रिपब्लिकन सेनेने केली आहे.चंद्रपूर शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा १९६९ रोजी बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या अथक प्रयत्नातून स्थापन करण्यात आला. सध्यस्थितीमध्ये पुतळ्याची अतिशय वाईट अवस्था झाली आहे. तसेच पुतळ्याला संलग्न असलेली जागा ज्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क असे संबोधण्यात येते. त्यावर देखील अतिक्रमण झाले आहे. रिपब्लिकन सेनेच्यावतीने २०१४ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा व संलग्न असलेल्या परिसराचे सौंदर्यीकरण करण्यासाठी चंद्रपूर शहर महानगरपालिकेला प्रस्ताव सादर करण्यात आला होता. तसेच वेळोवेळी या बाबीकडे महानगरपालिकेचे लक्ष वेधण्यात आले होते. त्याचप्रमाणे महानगरपालिकेने या सौंदर्यीकरणाच्या कामाकरिता ४० लाख रुपयांचा निधीसुद्धा उपलब्ध करून दिला आहे.या समितीमध्ये आंबेडकरी अनुयायी यांनासुद्धा समाविष्ट करून घेण्यात यावे आणि तसेच १४ एप्रिल पूर्वी नेहमीप्रमाणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे कार्यक्रम आयोजित करण्याकरिता अडसर ठरत असलेला आतील भागातील ट्रान्सफार्मर हा १४ एप्रिलला असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीपूर्वी हटवावा, आदी मागण्यांसाठी रिपब्लिकन सेनेचे जिल्हा प्रमुख तथागत पेटकर आपल्या कार्यकर्त्यांसह आयुक्त यांना भेटले. त्यावर आयुक्तांनी डॉ. आंबेडकर पूर्णाकृती पुतळ्याच्या सौंदर्यीकरणाच्या कामासाठी समिती स्थापना करण्याचे मान्य केले. समितीत समाविष्ट करण्यात येणाऱ्याची यादी तयार करून सादर करण्याची सूचना केली. याप्रसंगी शहर प्रमुख संदीप सोनोने, गणेश नवाडे, संदीप खोब्रागडे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)