शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रादिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
2
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
3
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
4
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
5
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
6
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
7
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
8
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
9
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
10
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
11
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
12
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
13
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
14
Top Marathi News LIVE Updates: महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री फडणवीसांना खास पत्र
15
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
16
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
17
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
18
Photos: पहिल्यांदाच बिकिनीत दिसली अपूर्वा नेमळेकर, स्विमिंगपूलमधील हॉट फोटो व्हायरल
19
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
20
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपूर दारूबंदीच्या निर्णयाने जिल्हा सीमा घेणार मोकळा श्वास

By admin | Updated: February 5, 2015 23:07 IST

२६ आॅगस्ट १९९३ रोजी दारूबंदी झालेल्या गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेवर चंद्रपूर, गोंदिया जिल्ह्यात तसेच छत्तीसगड व तेलंगणा राज्याच्या भागात मोठ्या प्रमाणावर दारू दुकान आहेत.

गडचिरोली : २६ आॅगस्ट १९९३ रोजी दारूबंदी झालेल्या गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेवर चंद्रपूर, गोंदिया जिल्ह्यात तसेच छत्तीसगड व तेलंगणा राज्याच्या भागात मोठ्या प्रमाणावर दारू दुकान आहेत. १ एप्रिल पासून चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी करण्याचा निर्णय राज्य सरकारने जाहीर केला आहे. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेलगतचे १५ दारू दुकान, बिअर शॉपी व भट्ट्या बंद होणार आहे. त्यामुळे दारूबंदी असलेल्या जिल्ह्याची सीमा चंद्रपूर जिल्ह्याच्या भागात आता मोकळा श्वास घेणार आहे.२६ आॅगस्ट १९८२ ला चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन करून गडचिरोली हा जिल्हा निर्माण करण्यात आला. त्यानंतर ११ वर्षांनी गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी करण्यात आली. परवानाप्राप्त दारू दुकान जिल्ह्यातून हद्दपार झालेत. मात्र लगतच्या चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी नसल्याने या भागात गडचिरोलीच्या सीमेला लागूनच १५ दारू दुकानांचा डेरा दाखल झाला. यामध्ये सावली तालुक्याच्या व्याहाड भागात पाच दुकान तर चामोर्शी तालुक्याच्या सीमेवरील आष्टी लागून चंद्रपूरच्या गोंडपिंपरी तालुक्यात चार दारू दुकाने व हातभट्ट्यांचा व्यवसाय तर आरमोरी तालुक्याला लागून ब्रह्मपुरी तालुक्यात पाच बिअर शॉपी परवाना घेऊन सुरूच होते. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्याच्या दारूबंदीला कुठेही अर्थ उरला नव्हता. जिल्ह्यातील दारू शौकीत या भागात जाऊन आपली दारूची भूक भागवून घेत होते. आता १ एप्रिल पासून चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी करण्याचा निर्णय राज्यमंत्री मंडळाने घेतला आहे. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्याच्या तीन सीमा दारूमुक्त होणार आहे. सावली, गोंडपिंपरी व ब्रह्मपुरी तालुक्यात सीमा भागात असलेले दारू दुकान, बिअर शॉपी व हातभट्ट्या बंद केल्या जातील. मात्र देसाईगंज तालुक्याला लागून असलेल्या लाखांदूर भागात तसेच कोरची तालुक्याला लागून असलेल्या छत्तीसगड, सिरोंचा, एटापल्ली, भामरागड तालुक्याला लागून असलेल्या छत्तीसगड, तेलंगणा राज्याच्या सीमांमध्ये मात्र दारूचे अवैध दुकान कायम राहणार आहेत. या राज्यात फिरते दारू दुकानेही आहेत. त्यामुळे ते दुकान जिल्ह्यात घुसखोरी करण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या दारूबंदीवरचे ग्रहण कायमच राहणार आहे. (जिल्हा प्रतिनिधी)