शहरं
Join us  
Trending Stories
1
पंधराशेच्या बदल्यात लेकींवर अत्याचार करण्याचा अधिकार कुणाला दिलाय का? राऊतांचा सरकारला सवाल
2
चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप
3
२ किलो सोनं, १५ हिंस्त्र कुत्रे, १५ गोल्ड लोन खाती; अंथरुणात लपलेल्या मोलकरणीचा पर्दाफाश
4
"पप्पा, जगणं अवघड झालंय...", वडिलांना फोन; न्यायाधीशाने संपवलं आयुष्य, पत्नीवर गंभीर आरोप
5
"देवाभाऊंच्या राज्यात ना लाडकी बहीण सुरक्षित, ना ३-४ वर्षांची बालिका"; काँग्रेसची बोचरी टीका
6
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
7
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
8
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
9
दहीवडा खाल्ल्यानंतर उलट्या आणि ताप; २७ मुलांसह ५८ जणांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
10
समोरासमोर आले नागा चैतन्य अन् समंथा? रिसेप्शन पार्टीला आपापल्या पार्टनरसोबत लावली हजेरी
11
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
12
हे काय नवीन? मोस्ट एलिजिबल बॅचलर आदित्य रॉय कपूरला डेट करतीये तारा सुतारिया, चर्चांना उधाण
13
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
14
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
15
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
16
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
17
"त्या नराधमाचा एन्काऊन्टर झाला तरच मानू की हे सरकार...", नरसापूर घटनेनंतर प्रवीण तरडे संतापले, सरकाला दिला अल्टिमेटम
18
'बीएच' सिरीज नंबर घेतला, पण कर भरायला विसरले !मुंबईत वाहनधारकांना बसला लाखो रुपयांचा दंड
19
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
20
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

१४३ जणांमध्ये ६० वर्षांवरील मृत्यू झालेल्यांची संख्या अधिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2020 05:00 IST

मार्च महिन्यापासून कोरोनाचे संकट घोंगावत आहे. प्रादूर्भाव टाळण्यासाठी सुरुवातीला लॉकडाऊन करण्यात आले. त्यानंतर हळूहळू शिथिलता देण्यात आली. मात्र यानंतर रुग्णसंख्या सातत्याने वाढत आहे. दरम्यान, जिल्ह्यात सर्वप्रथम २ मे ला पहिल्या रुग्णांची नोंद झाली. त्यानंतर हळुहळू ही संख्या वाढत आहे. २८ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात ९ हजार ५८२ वर रुग्णसंख्या पोहचली आहे.

ठळक मुद्देकोरोनाचे संकट : आठ तरुणांनीही गमावला आपला जीव

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यात कोरोनाने आपले पायमुळे घट्ट रोवले आहे. मागील काही दिवसांमध्ये रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. सध्यास्थितीत साडेऊन हजार रुग्णसंख्या पोहचली असून असून १४३ जणांना आपला जीव गमवावा लागला. यामध्ये सर्वाधिक मृत्यू ६० वर्षावरील नागरिकांचा झाला असून ती संख्या ६६ वर आहे. तर ३० ते ४० वयोगटातील आठ जणांना आपल्या प्राणाला मुकावे लागले.मार्च महिन्यापासून कोरोनाचे संकट घोंगावत आहे. प्रादूर्भाव टाळण्यासाठी सुरुवातीला लॉकडाऊन करण्यात आले. त्यानंतर हळूहळू शिथिलता देण्यात आली. मात्र यानंतर रुग्णसंख्या सातत्याने वाढत आहे. दरम्यान, जिल्ह्यात सर्वप्रथम २ मे ला पहिल्या रुग्णांची नोंद झाली. त्यानंतर हळुहळू ही संख्या वाढत आहे. २८ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात ९ हजार ५८२ वर रुग्णसंख्या पोहचली आहे. रुग्णसंख्या वाढल्यामुळे मध्यंतरीच्या काळात जिल्ह्यातील रुग्णालयातील बेड फुल झाल्यामुळे काहींना त्रास सहन करावा लागला. अनेकांनी नागपूर, सेवाग्रामचीही वाट धरली. मात्र फारसा उपयोग झाला नाही. प्रशासनाने खासगी रुग्णालयाचा पर्याय उपलब्ध करून देत यावर काही प्रमाणात नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. त्यातच सप्टेंबर महिन्यामध्ये तब्बल दोन वेळा जनता कर्फ्यू लावण्यात आला. या महिन्यामध्ये प्रथम चार दिवस जनता कर्फ्यू लावल्यानंतर रुग्णसंख्या तसेच मृत्यूचे प्रमाण  वाढल्याने पुन्हा २५ पासून जनताकर्फ्यूची हाक देण्यात आली. दरम्यान, जिल्ह्यातील ६० वर्षावरील ६६ नागरिकांना कोरोनाने आपल्या कवेत घेतले असून हा आकडा इतर वयोगटाच्या मृृत्यूच्या तुलनेत अधिक आहे. यामध्ये ५० ते ६० वर्षातील ४४ जणांना, ४० ते ५० वयोगटातील २५ जणांना तर ३० ते ४० या वयोगटातील सात पुरुष तसेच एका महिलेला आपला जीव गमवावा लागला. दरम्यान, सर्वात जास्त मृत्यू चंद्रपूर शहरात झाले असून ते ८३ वर पोहचले आहे. तर जिवती, पोंभूर्णा, सिंंदेवाही या तालुक्यात सुदैवाने आजपर्यंत एकही मृत्यूची नोंद नाही. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या