हृदयविकाराच्या झटक्याने नववीच्या विद्यार्थिनीचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2018 00:17 IST2018-07-06T00:17:13+5:302018-07-06T00:17:50+5:30
येथील हिंदू ज्ञान मंदिर विद्यालयातील नवव्या वर्गाच्या विद्यार्थिनीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी दुपारी १२.१५ वाजताच्या सुमारास घडली. या विद्यार्थिनीला वर्गातच हृदयविकाराचा झटका आला.

हृदयविकाराच्या झटक्याने नववीच्या विद्यार्थिनीचा मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
ब्रम्हपुरी : येथील हिंदू ज्ञान मंदिर विद्यालयातील नवव्या वर्गाच्या विद्यार्थिनीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी दुपारी १२.१५ वाजताच्या सुमारास घडली. या विद्यार्थिनीला वर्गातच हृदयविकाराचा झटका आला.
अन्नपूर्णा ज्ञानेश्वर मेश्राम (१५) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. सदर विद्यार्थिनी ब्रम्हपुरी येथील फाशी चौकातील रहिवासी असून हिंदू ज्ञान मंदिर विद्यालय येथे इयत्ता नवव्या वर्गात शिक्षण घेत होती. गुरुवारी विद्यालयात प्रार्थना आटोपून वर्गात गेली असता वर्गातच तिची प्रकृती बिघडली. शिक्षकवृंदांनी तत्परता दाखवित तिच्या पालकांना माहिती देवून तात्काळ ख्रिस्तानंद रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतु उपचारादरम्यान सदर विद्यर्थिनीचा मृत्यू झाला. या विद्यार्थिनीला वयाच्या दहाव्या वर्षांपासून ह्रदयविकाराचा त्रास होता आणि आॅपरेशन करूनही काहीच उपयोग होणार नाही, असा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. त्यामुळे सदर विद्यार्थिनीवर शस्त्रक्रिया करण्यात आली नाही. अशातच आज काळाने तिच्यावर झडप घातली. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.