शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
2
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
3
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
4
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
5
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
6
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
7
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
8
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
9
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
10
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
11
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
12
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
13
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
14
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
15
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
16
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
17
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
18
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
19
न्यूझीलंडच्या नव्या खेळाडूंनी पाकिस्तानला घाम फोडला; आफ्रिदीने कशीबशी लाज राखली
20
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 

झुंजीत वन मजुरासह अस्वलाचाही मृत्यू, भद्रावतीच्या तिरवंजा वनातील थरार 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 07, 2018 6:00 PM

बांबू कटाईसाठी जंगलात गेलेल्या १० वनमजुरांवर अस्वलाने अचानक हल्ला चढविला. तीन मजूर समयसुचकतेने पळून गेले. चार जण तेथील एका झाडावर चढल्याने ते बचावले, तर तिघांची अस्वलाशी कडवी झुंज झाली.

चंद्रपूर (भद्रावती) : बांबू कटाईसाठी जंगलात गेलेल्या १० वनमजुरांवर अस्वलाने अचानक हल्ला चढविला. तीन मजूर समयसुचकतेने पळून गेले. चार जण तेथील एका झाडावर चढल्याने ते बचावले, तर तिघांची अस्वलाशी कडवी झुंज झाली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या एका वनमजुराचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर दोघेजण गंभीर जखमी झाले. ही घटना मंगळवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास भद्रावती वनपरिक्षेत्रातील तिरवंजा राखीव वनातील कक्ष क्रमाक २०३ मध्ये घडली. बुधवारी सकाळी घटनास्थळ परिसरात हल्ला करणारे अस्वलही मृतावस्थेत आढळून आले.धर्मसिंग संबरू टेकाम (५२) असे मृतकाचे नाव आहे, तर जखमींमध्ये प्रेमलाल धानू सायाम (४२) व संबलिंग सिंग चौधरी उईके (२१) तिघेही रा. बय्यर म. प्र. यांचा समावेश आहे. पैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींना पुढील उपचारासाठी नागपूरला हलविण्यात आले असल्याची माहिती भद्रावती वनपरिक्षेत्राधिकारी एस. व्ही. म्हैसकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. प्राप्त माहितीनुसार, भद्रावती वनपरिक्षेत्रातील तिरवंजा राखीव वनात सुमारे  १० वनमजुर बांबू कटाईचे काम करीत होते. अशातच एकाएकी एका अस्वलाने त्या वनमजुरांवर हल्ला चढविला. हे बघून तेथील अन्य चार वनमजूर आपला जीव वाचविण्यासाठी झाडावर चढले, तर अन्य तिघे जण घटनास्थळावरून पळून गेले. तर उर्वरित धर्मसिंग संबरू टेकाम, प्रेमलाल धानू सायाम व संबलिंग सिंग चौधरी उईके या तिघांची अस्वलाशी कडवी झुंज झाली. यामध्ये तिघेही गंभीर जखमी झाले. धर्मसिंग संबरू टेकाम यांनी अस्वलाशी कडवी झुंज देताना अस्वलावर जवळच्या कु-हाडीने हल्ला चढविला. यामध्ये अस्वलही गंभीर जखमी झाली. मात्र धर्मासिंग हा काहीवेळाने जागीच गतप्राण झाला. पळून गेलेल्या वनमजुरांनी याची माहिती वनपरिक्षेत्राधिकारी म्हैसकर यांना दिली. लगेच त्या  वनरक्षक गुरुदास वरखेडे, भोगेकर व सदर वनमजुरांना घेऊन घटनास्थळी दाखल झाल्या. यानंतर जखमींना उपचारार्थ रुग्णालयात हलविले. आज सकाळी वनविभागाच्या अधिका-यांना घटनास्थळी हल्ला करणारी अस्वलही मृतावस्थेत आढळली.

टॅग्स :forestजंगलforest departmentवनविभाग